महेंद्रसिंह धोनीचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्याची चाहत्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. माहीचे फॅन्स सर्वच वयोगटातून येतात. मात्र तुम्ही महेंद्रसिंह धोनीच्या एका चाहत्याबद्दल ऐकलं का, जो चक्क 103 वर्षांचा आहे!
होय हे अगदी खरं आहे! धोनीच्या या चाहत्याचं नाव आहे एस रामदास. रामदास यांना क्रिकेट आणि महेंद्रसिंह धोनीबद्दल कमालीची आवड आहे. वयाच्या या टप्प्यावरही ते चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्रसिंह धोनीला पाठिंबा देण्याची एकही संधी सोडत नाहीत. चेन्नई सुपर किंग्जच्या टीमनं एस रामदास यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ अल्पावधीत तुफान व्हायरल झाला. क्रिकेट चाहते यावर कमेंट करून एस रामदास यांच्या वेडाचं फार कौतुक करत आहेत.
व्हिडिओमध्ये एस रामदास म्हणतात की, “मी 103 वर्षांचा आहे, परंतु मी म्हातारा नाही. मला क्रिकेटची खूप आवड आहे. मला क्रिकेट बघायला आवडतं.” ते पुढे म्हणतात की, “मला क्रिकेट खेळण्याची भीती वाटत होती. पण मला ते बघायला खूप आवडायचे.” रामदास यांनी व्हिडिओमध्ये बोलताना त्यांना चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना पाहायची माहीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
The Curious Case of a 1️⃣0️⃣3️⃣ Year old Superfan! 🥳📹#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/weC96vzVSB
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 24, 2024
आयपीएलच्या या हंगामातील चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर ती संमिश्र राहिली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 8 सामन्यांनंतर 8 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सनं आतापर्यंत 4 सामने जिंकले असून, 4 सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे.
आता रविवारी (28 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जसमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान असेल. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
दे चौकार, दे षटकार!, नेट्समध्ये दिसलं जसप्रीत बुमराहचं वेगळच रुप; तुम्ही व्हिडिओ पाहिला का?
200 रनचं टार्गेट पाहताच काय करावं ते सुचत नाही! धावांचा पाठलाग करताना हैदराबादची आकडेवारी खूपच खराब