fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

७ का दम! कॅप्टन कूल धोनीच्या ७ नंबरच्या जर्सीची रोमांचक कहानी

MS Dhoni And His Secret Behind His Love For No. 7

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या अफलातून खेळीने भारतीय संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवले. तो केवळ चांगला यष्टीरक्षक नाही. तर, दमदार फलंदाज आणि यशस्वी कर्णधारदेखील आहे. तसं तर गेल्या १६ वर्षांपासून क्रिकेट खेळणाऱ्या धोनीच्या जर्सीचा क्रमांक ७ आहे, हे सर्वांनाच माहित असणार. पण, नक्की धोनीचे ७ नंबरशी काय कनेक्शन आहे, हे खूप कमी जणांना माहित असणार.

तरी जाणून घेऊया, धोनी आणि ७ नंबरमधील कनेक्शनचा एक रोमांचक किस्सा MS Dhoni And His Secret Behind His Love For No. 7

कॅप्टन कूल धोनी हा ७ नंबरला त्याचा लकी (नशीबवान) नंबर मानतो. यामागचे सर्वात मोठे कारण हे त्याचा वाढदिवस आहे. धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ला म्हणजे ७व्या महिन्यात ७व्या तारखेला झाला होता. धोनीचा अंकशास्त्रावर (न्यूमेरोलॉजी) खूप जास्त विश्वास आहे, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

त्या मुलाखतीत आपल्या ७ नंबरशी असणाऱ्या कनेक्शनचा किस्सा सांगताना धोनी म्हणाला, एकदा त्याला एका मोठ्या स्मार्टफोन कंपनीने त्यांच्यासोबत करार करण्याची विनंती केली होती. तेव्हा धोनीने त्यांना होकार देत म्हटले होते की, मी करारावर स्वाक्षरी करेन पण ७ डिसेंबरला करेन. एवढेच नाही तर, तो ७ डिसेंबरला सकाळी ७ वाजता ७ वर्षांसाठी करार करेल असे धोनीने त्यांना सांगितले होते. तसे पाहिले तर, ७ वर्षांसाठी एखाद्या कंपनीसोबत करार करणे खूप मोठी गोष्ट असते.

धोनीपुर्वी कोणत्याही खेळाडूने कोणत्याही कंपनीसोबत एवढ्या वर्षांचा करार केला नव्हता. पण, जे कोणी करत नाही ते धोनी करुन दाखवतो. अखेर त्याने ठरवल्यानुसार तो करार मान्य करण्यात आला.

यावरुन दिसून येते की, धोनीला ७ हा नंबर किती आवडतो. मात्र, धोनीने त्याच्या निळ्या जर्सीवरील ७ नंबर हा त्याने स्वत: निवडला नव्हता. याविषयी धोनीने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या जर्सीवरील ७ नंबर हा मला माझ्या नशिबामुळे मिळाला आहे. कारण, त्यावेळी केवळ हाच क्रमांक उरलेला होता. तेव्हापासून धोनी ७ नंबरची जर्सी घालूनच खेळत असतोे. हा नंबर त्याच्यासाठी इतका लकी ठरला की, धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली २००७मध्ये भारताला पहिले टी२० विश्वचषक जिकूंन दिले.

ट्रेंडिंग घडामोडी- 

वेस्ट इंडिजच्या केराॅन पोलार्डचा करार रद्द, आता…

वयाच्या चौथ्या वर्षी जागतिक विक्रम, प्रशिक्षकाचा खून आणि खेळाडूचा अस्त

भारताला कसोटीत पराभूत करणाऱ्या केन विलियम्सनच्या कर्णधारपदावर आता गदा

You might also like