कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालू असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होऊन १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. दरम्यान २२ सप्टेंबर रोजी शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२०चा चौथा सामना झाला होता. त्या सामन्यामधील एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आणि एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल दिसत आहेत.
झाले असे की, सामन्यापुर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली. त्यानंतर राजस्थान संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ मैदानाबाहेर निघून गेला. तेवढ्यात जयस्वाल धोनीला भेटण्यासाठी आला आणि त्याने धोनीसमोर हात जोडून त्याला नमस्कार केला. त्यांच्या भेटीचा तो क्षण कॅमेरामध्ये रिकॉर्ड झाला. त्यांचा तो व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडला. त्यामुळे अजूनही धोनी आणि जयस्वाल यांची त्या व्हिडिओ आणि फोटोवरुन चर्चा होत आहे.
विशेष म्हणजे, जयस्वालच्या उत्तर प्रदेश राज्यातील कानाकोपऱ्यात त्यांच्या चर्चेला उधान आले आहे. त्यातही उत्तर प्रदेशमधील भदोही या जिल्ह्यात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. परंतु अनेकांना प्रश्न पडला आहे की, हा व्हिडिओ भदोही या जिल्ह्यात का एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे?. चला तर जाणून घेऊया…
खरं तर, जयस्वालचा जन्म उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील सुरिया या गावात झाला होता. तो गुरबत येथे लहानाचा मोठा झाला आहे. त्याला लहानपणीपासून क्रिकेटची आवड होती आणि जस जसा तो मोठा होत गेला तस तशी त्याची क्रिकेटची आवड वाढत गेली.
पुढे तो क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईला आला. तिथे त्याने पाणीपुरीची गाडीही चालवली. शेवटी २०१९ साली त्याला १९ वर्षांखालील क्रिकेट संघात जागा मिळाली आणि तिथून त्याच्या कारकिर्दीला वेगळे वेळण मिळाले. १९ वर्षांखालील विश्वचषकातील त्याच्या दमदार प्रदर्शनामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या १८ वर्षीय खेळाडूला आयपीएल २०२० लिलावात राजस्थान संघाने २.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
Spirit of Cricket!😍💛
@yashasvi_j @msdhoni @ChennaiIPL #IPL2020 #Dhoni #CSKvRR
Screengrab courtesy: starsports pic.twitter.com/HnTGp2EmV9— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) September 22, 2020
आतापर्यंत जयस्वालने आयपीएलमध्ये फक्त १ सामना खेळला. त्यात त्याला जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. तो केवळ ६ धावाच करु शकला. पण पुढे संधी मिळाल्यास हा धुरंधर नक्कीच आपली कमाल दाखवेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू म्हणतो, “चेन्नईला पाँइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर पाहून दुःख वाटते”
फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या ‘या’ मैदानावर रंगणार दिल्ली विरुद्ध कोलकाताची लढत
IPL 2020 – आज बेंगलोर-राजस्थान संघ आमने-सामने; जाणून घ्या सामन्याविषयी सविस्तर माहिती
ट्रेंडिंग लेख-
IPL- पॉइंट्स टेबलमधील टॉप ४ मध्ये सर्वाधिकवेळा प्रवेश करणारे ३ संघ
आयपीएल २०२० – पहिल्या १२ सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारे टॉप ५ गोलंदाज
धोनीच्या नव्या दमाच्या भारतीय संघातील ‘स्विंग का सुलतान’