आयपीएल 2020 (IPL 2020) चा 13 वा हंगाम (13th Season) अगदीच जवळ येत आहे. याचकारणामुळे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) चाहते त्याची मैदानावर पुनरागमन करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
3 मार्चपासून धोनी आपल्या चेन्नई सुपर किंग्स संघाच्या (Chennai Super Kings) कॅंपमध्ये भाग घेणार आहे. त्यानंतर तो संघाबरोबर सरावही करणार आहे.
परंतु त्यापूर्वी आपल्या घरच्या मैदानात (जेएससीए स्टेडिअम) सराव करण्यासाठी पोहोचलेला धोनी खेळपट्टीवर रोलर चालवताना दिसला.
धोनीचा खेळपट्टीवर रोलर चालवितानाचा व्हिडिओ धोनीच्या चाहत्याने ट्विटरवरून शेअर केला आहे. त्या चाहत्याने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, ‘एक व्यक्ती, अनेक भूमिका’.
One Man, Different Roles ????????
Mahi trying his hands on pitch roller machine at JSCA yesterday! #DhoniAtJSCA #MahiWay #Dhoni pic.twitter.com/Hl0TZND4V0
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) February 26, 2020
या व्हिडिओत धोनी रांचीतील झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या (JSCA International Stadium) खेळपट्टीवर रोलर चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
जुलै 2019च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर धोनीने आतापर्यंत भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही.
धोनीने जम्मू-काश्मीरमधील आपल्या विशेष ड्युटीमध्ये भारतीय सैन्याबरोबर काही काळ घालवला होता. यानंतर त्याने मुंबईमध्ये एक चॅरिटी फुटबॉल सामनाही खेळला होता. या व्यतिरिक्त धोनीला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते.
विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत पोहचलेल्या टीम इंडियाचा कहर विक्रम
वाचा- ????https://t.co/xgHpjXs16V????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDWvNZW— Maha Sports (@Maha_Sports) February 27, 2020
खेळपट्टी कुठे दिसतेय का? शोधून दाखवा…
वाचा- ????https://t.co/zXjmK7xfAz????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 27, 2020