आयपीएल 2023चा 41वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. सीएसकेचे होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला, ज्यामध्ये पाहुण्या पंजाब किंग्जने 4 विकेट्स राखून विजय मिळवला. पंजाबने 201 धावांचे लक्ष्य गाठताना शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. पराभवानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने संघातील गोलंदाजांवर खापर फोडले. धोनीच्या मते मध्यल्या काही षटकांमध्ये गोलंदाजांनी अतिरिक्त धावा खर्च केल्यामुळे सीएसकेला पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, सीएसकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. निर्धारित 20 षटकांमध्ये सीएसकेने 4 बाद 200 धावा साकारल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने शेवटच्या चेंडूवर तीन धावा घेत विजय मिळवला. 15 षटके संपल्यानंतर सीएसकेची धावसंख्या 3 बाद 129 धावा होती. पण 16 व्या षटकात तुषार देशपांडे याने 24 धावा खर्च केल्या. तर पुढच्याच षटकात रविंद्र जडेजा याने 17 धावा खर्च केल्या. या दोन षटकांमध्ये पंजाबच्या फलंदाजांना सुरू सापडला आणि संघ लक्ष्याचा जवळ देखील पोहोचला. शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 9 धावा हव्या होत्या. या षटकात युवा मथिशा पथिरानाने चांगली गोलंदाजी केली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सिकंदर रजा (7 चेंडूत 13 धावा) याने शेवटच्या चेंडूवर तीन धावा घेतल्याने पंजाबला विजय मिळाला.
16 आणि 17व्या षटकात गोलंदाज सीएसकेसाठी महागात पडले. कर्णधार एमएस धोनी () यानेही याविषयी नाराजी व्यक्त केली. सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला, “मधल्या षटकांमध्ये दोन षटके आम्ही खराब टाकली. गोलंदाजांना कुठे गोलंदाजी करायची, हे माहीत पाहिजे. फलंदाज मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न करतील हे, स्पष्ट होते.” यावेळी धोनीने सीएसकेच्या फलंदाजांनाही सुनावले. धोनीच्या मते संघातील गोलंदाज युवा असल्यामुळे फलंदाजांनी अधिक जबाबदारी घेतली पाहिजे. “फलंदाजीमध्ये आम्ही 10 ते 15 धावा अजून करू शकत होतो. आमचे गोलंदाज अजून युवा आहेत. त्यांना अजून थोडा अनुभव घ्यायचा आहे,” असे धोनी म्हणाला. धोनीने शेवटची युवा पथिरानानेही कौतुक केले.
दरम्यान, उभय संघांतील हा साना पंजाबने जिंकला असला तरी सीएसकेचा सलामीवीर डेवॉन कॉनवे याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. कॉनवेने 52 चेंडूत नाबाद 92 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात पंजाबसाठी एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. पण तरीही सीएसकेला पराभूत केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानविरुद्ध मुंबईच्या गोलंदाजांनी 200+ धावा दिल्या, पण चावला यशस्वी, पाहा चालू हंगामातील आकडेवारी
बर्थडे दिवशी रोहित बनला मुंबई इंडियन्सचा ‘विक्रमादित्य’, 1000 व्या सामन्यात बनवले खास पराक्रम