---Advertisement---

‘थाला’ची क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याचा 1200 कि.मी सायकल प्रवास

---Advertisement---

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्याला 5 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण अजूनही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तो फक्त आयपीएलमध्येच पाहायला मिळतो. पण चाहत्यांना आजही त्याचे वेड आहे. असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे त्याच्या एका चाहत्याने सुमारे 1200 किलोमीटर सायकल चालवून रांचीमधील त्याचे घर गाठले. परंतु अनेक दिवस होऊनही तो एमएस धोनीला भेटू शकले नाही.

धोनीचा एक मोठा चाहत्याला निराशा हाती लागली आहे. जेव्हा तो अनेक दिवस धोनीच्या घराबाहेर तळ ठोकून होता. परंतु तो त्याच्या आवडत्या क्रिकेटरला भेटू शकला नाही. गौरव कुमार नावाच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो धोनीच्या फार्म हाऊस पर्यंत कसा पोहोचला हे सांगितले आहे. या चाहत्याने दिल्ली ते रांची असा 1,200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला होता. त्याला धोनीला भेटायचे होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gᴀuʀᴀv Kumar (@epic_g7)

एमएस धोनीचा हा चाहता जवळपास आठवडाभर फार्महाऊसच्या गेटवरच थांबला.धोनीची एक झलक पाहण्यासाठी त्याने तिथे झोपण्यासाठी बाहेर तंबू ठोकले. शेवटी त्याने धोनीला दोनदा गेटमधून बाहेर पडताना पाहिला. धोनीने केवळ हात केले. व निघून गेला त्याने आपली कार थांबवली नाही. आता धोनीच्या वागण्यावर लोक धोनीवर टीका करत आहेत आणि त्याला अहंकारी म्हणत आहेत.

धोनी जवळजवळ दररोज त्याच्या फार्महाऊसच्या बाहेर वाट पाहत असलेल्या चाहत्यांशी सेल्फी घेण्यासाठी आणि हस्तांदोलन करण्यासाठी त्याची कार थांबवतो. या खास प्रसंगी धोनीला घाई झाली असावी, ज्यामुळे त्याने आपली गाडी थांबवली नाही किंवा गौरव धोनीला भेटण्यासाठी इतक्या दूरवरून आला होता याची त्याला कल्पना नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gᴀuʀᴀv Kumar (@epic_g7)

हेही वाचा-

IND vs BAN: सामनावीर कोण ठरला, मालिकावीर ट्रॉफी कोणाला मिळाली?
IND VS NZ; कसोटी मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का; बाबर आझमने कर्णधारपद सोडले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---