सन २०१६मध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रकाशित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. धोनीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत याचे बरोबर २ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्याच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्ताने अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सुशांतला बॉलिवूडमध्ये स्टार म्हणून ओळख मिळवून देण्यात ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा मोठा वाटा आहे. या चित्रपटासाठी सुशांतनेही बरीच मेहनत घेतली होती.
‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाची शूटिंग सुरु होण्यापुर्वी सुशांत धोनीला व्यवस्थित समजून घेण्यासाठी त्याच्या सहवासात राहत होता. काही वृत्तांमध्ये तर असे दिले गेले होते की, स्वत: धोनीने सुशांतला ट्रेनिंग दिली होती. पण, नेहमी मैदानावर शांत राहणारा कॅप्टन कूल सुशांतच्या प्रश्नांना कंटाळून त्याच्यावर रागावला होता. स्वत: सुशांतने या गोष्टीचा खुलासा केला होता.
मुंबई मिररशी बोलताना सुशांत म्हणाला होता की, “मी सतत एकच प्रश्न विचारल्यामुळे धोनी खूप वैतागला होता. मी पहिल्यांदा त्याला रागावताना पाहिले होते. सुरुवातीचे २-३ दिवस मी धोनीला काही प्रश्न विचारले, ज्याची त्याने शांततेने उत्तरे दिली. नंतर धोनी म्हणाला, तू प्रश्न खूप विचारतोस. मी नंतर येतो. मी धोनीला एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारत असायचो. त्यामुळे तो खूप वैतागत असायचा.”
याविषयी बोलताना धोनी म्हणाला होता की, “सुरुवातीला मला माझ्याविषयी बोलायला वेगळेच वाटत होते. सुशांत मला एक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारत असायचा आणि जर त्याला त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे सारखे उत्तर मिळाले, तरच त्याला पटायचे की मी प्रामाणिकपणे खरी उत्तरे दिली आहेत. मग तो पुढचा प्रश्न विचारत असायचा. १५ मिनिटांनंतर स्वत:विषयी सांगत-सांगत मी कंटाळून जायचो. त्यामुळे मला वाटायचे की, आता ब्रेक घ्यावा आणि मी उठून निघून जायचो.”
नीरज पांडे दिग्दर्शीत एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात धोनीच्या लहानपणापासून ते भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धोनीने केला संघर्ष, त्याची लव्ह लाइफ या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’
‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा