भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.
“तुम्ही मला आजपर्यंत खूप प्रेम व पाठींबा दिला आहे. संध्याकाळच्या ७ वाजून २९ मिनीटांपासून तुम्ही मला निवृत्त झाले असे समजा, ” अशी पोस्ट त्याने केली आहे.
धोनीने एकूण ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने १७२६६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १६ शतके, १०८ अर्धशतके, ३५९ षटकार, ६३४ झेल व १९५ यष्टीचीतचा समावेश आहे.
धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्याच नेतृत्त्वाखाली भारताने २००७ टी२० विश्वचषक, २०११ क्रिकेट विश्वचषक व २०१२ आयसीसी चँपियन्स ट्रॉफी जिंकली होती.