धोनीने सामन्याचा शेवट षटकाराने केल्यामुळे चाहत्यांच्या २०११ विश्वचषकाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. धोनीने या सामन्यात शेवटच्या षटकात सिद्धार्थ कौलला ९६ मीटरचा जबरदस्त षटकार मारला आहे. अगदी अशाच प्रकारे धोनीने श्रीलंकेविरुद्ध २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही षटकार मारला होता आणि भारतीय संघाने त्यांच्या इतिहातील दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. चाहते आता सोशल मीडियावर धोनीच्या या षटाकराची आणि विश्वचषकातील षटकारीची तुलनाही करू लागले आहेत.
हैदराबादविरुद्धच्या सामन्या शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती आणि स्ट्राईकवर अंबती रायडू होता. त्याने षटकातील पहिला चेंडू डाॅट खेळला. दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि धोनीला स्ट्राईक दिली. त्यानंतर चेन्नईला विजयासाठी ४ चेंडूत २ धावांची आवश्यकता होती. कौलच्या षटकातील तिसरा चेंडू डाॅट गेला आणि हैदराबादच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या. अशातच षटकातील चौथ्या चेंडूत धौनीने एक जबरदस्त षटकार मारला आणि चेन्नईला हंगामातील ९ वा विजय मिळवून दिला. हैदराबादविरुद्ध मिळवलेल्या या विजयानंतर आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चेन्नई पहिला संघ बनला आहे.
https://twitter.com/ShivNagre3/status/1443794748687273986?s=20
https://twitter.com/RuturajFC/status/1443763644420874240?s=20
https://twitter.com/Thyview/status/1443632540586180609?s=20
https://twitter.com/TrollMSDHaterz/status/1443639208342523918?s=20
दरम्यान, हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला होता. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सच्या नुकसानासह २० षटकात १३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चैन्नईने त्यांचे आव्हान १९.४ षटकात आणि ६ विकेट्स राखून गाठले होते.