जयपूर। गुरुवारी(11 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 25 वा सामना सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने 4 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यातील नाट्यपूर्ण झालेल्या शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी रविंद्र जडेजाला मस्तीमध्ये बॅटने मारताना दिसला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
झाले असे की चेन्नईला या सामन्यात विजयासाठी शेवटच्या षटकात 18 धावांची गरत होती. त्यावेळी जडेजाने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पण हा षटकार त्याने तोल जाऊन खाली पडताना मारला आणि त्यानंतर तो खाली पडला. तसेच गोलंदाजी करणारा बेन स्टोक्सही खाली पडला.
पण हा षटकार पाहुन जडेजा बरोबरच स्टोक्सही चकीत झाला आणि काही क्षणांसाठी हे दोघेही उठले नाहीत. त्याचवेळेस धोनी जडेजाकडे जाऊन उठ आणि धाव घेण्यासाठी पळ असे सांगत होता. पण तोपर्यंत चेंडूने बाउंड्री लाईन पार केली होती. हे जेव्हा धोनीच्या लक्षात आले तेव्हा त्याने मजेने खाली पडलेल्या जडेजाच्या हेल्मेटवर बॅटने मारायला सुरुवात केली.
— Aditya Tiwari (@journAditya23) April 11, 2019
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या होत्या आणि चेन्नईला 152 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने पहिल्या चार विकेट्स 24 धावातच गमावल्या.
पण त्यानंतर धोनी आणि अंबाती रायडूने अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या डावाला आकार दिला. या दोघांनी मिळून 5 व्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. पण स्टोक्सने 18 व्या षटकात रायडूला 57 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तसेच शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने धोनीला 58 धावांवर असताना त्रिफळाचीत करत सामन्यात रंग भरले.
पण अखेर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना मिशेल सँटेनरने षटकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच चेन्नईने या मोसमातील 6 वा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वस स्थान अधिक भक्कम केले आहे.
अंपायरवर चिडला धोनी-
याच सामन्यात नेहमी शांत असणारा धोनी चिडलेला दिसला आहे. झाले असे की तो बाद झाल्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर मैदानावरील पंच उल्हास गंधे यांनी नो बॉलचा इशारा केला, पण लगेचच स्वेअर लेगवरील पंच ब्रुस ऑक्सनफॉर्डशी चर्चा करुन हा नो बॉलचा निर्णय बदलला.
त्यामुळे मैदानात असलेला रविंद्र जडेजा पंचाशी वाद घालू लागला. काही वेळीत धोनीही मैदानात आला, त्याने पंचाशी चर्चा करत वाद घातल्याचे दिसले. त्यामुळे धोनीला 50 टक्के मॅच फीचा दंड करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मदतीला येणार हा दिग्गज गोलंदाज
–रविंद्र जडेजा, एमएस धोनीने केली ही खास सेंच्यूरी पूर्ण…
–नो बॉल प्रकरणी धोनी का गेला अंपायरकडे, सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खूलासा