टॉप बातम्या

मैदानाबाहेरही थालाचीच हवा! या कंपनीने काढली चक्क धोनीच्या नावाची कार

सिट्रोएन इंडियाने सी3 एअरक्रॉसची विशेष आवृत्ती लॉन्च केली आहे. याला ‘धोनी एडिशन’ नाव देण्यात आले आहे. महान भारतीय  क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांना आदर म्हणून त्याचे देण्यात आले आहे, धोनी या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. सोशल मीडियावर या कारची चांगलीच चर्चा होत आहे.

भारतामध्ये  एम एस धोनी हा खूप मोठा ब्रॅन्ड म्हणून ओळखला जातो. भारतासह जगभारत थालाचे अनेक चाहते आहेत. आधी देखील थालाच्या एका चाहत्याने त्याच्या रेस्टाॅरंटला धोनीचे नाव दिले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली धाोनीच्या नावाची कार ही लिमिटेड एडीशन आहे. या कारची किंमत अंदाजे 11.78 लाख इतकी आहे. कंपनीने धोनी एडिशनचे मर्यादित 100 कारच लाॅन्च करणार आहे. आता या ‘धोनी एडिशन’ च्या कार लाॅन्च मुळे धाोनीचे नाव पुन्हा चर्चेत आला आहे.

भारतीय संघासाठी धोनीने 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध आपल्या करिअरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो 15 ऑगस्ट 2020 रोजी इंस्टाग्राम वर व्हिडिओ शेअर करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती. पण मात्र धोनी आयपीएल मध्ये अजून सहभागी आहे.

महत्तवाच्या बातम्या-

भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्रात 5 सामने खेळले जाणार; पुण्यात किती सामन्यांचं आयोजन?
टी20 विश्वचषकादरम्यान ‘या’ खेळाडूला मोठा धक्का; जाणून घ्या काय झाले नुकसान!
अपसेट करण्यात माहीर आहे बांग्लादेशचा संघ! विजयासाठी टीम इंडियाला संघात करावे लागतील हे बदल

Related Articles