आज रात्री 7.30 वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक दिघेही सज्ज आहेत. त्यात न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सीएसकेचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने त्याच्या संघाबद्दल माहिती दिली आहे.
तो म्हणाला, “मोठ्या सामन्यात विजय मिळवण्याचा त्याच्या संघाचा अनुभव पुढील 53 दिवस उपयुक्त ठरेल. गेल्या महिन्यात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो तंदुरुस्त आहे आणि मानसिकदृष्ट्या खूप खंबीर आहे.”
अनुभवी खेळाडूंबद्दल बोलतांना फ्लेमिंग म्हणाला, “आमच्या अनुभवी आणि जुन्या खेळाडूंसाठी इतके दिवस मिळालेली विश्रांती अधिक प्रभावी ठरू शकते. एमएस धोनी चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे. धोनी, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव आणि इम्रान ताहिर या सर्व खेळाडूंचे वय 35 च्या वर आहे. या अनुभवी खेळाडूंवर संघाची अधिक जबाबदारी असेल.”
“अनुभवी खेळाडू महत्त्वाच्या सामन्यात कठीण प्रसंगाचा सामना करू शकतात आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कारकीर्दीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ते सामन्याची स्थिती बदलू शकतात, दबाव सहन करू शकतात आणि परिस्थितीचे मूल्यांकन करू शकतात. म्हणूनच अनुभवाला आपण खूप महत्व देतो. त्यात कौशल्याचीदेखील साथ मिळते. आपण तरुण खेळाडूंना संघात स्थान देऊन संघ संतुलित ठेवू शकतो.” असेही पुढे बोलतांना तो म्हणाला
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेसाठी आनंदाची बातमी! पहिल्या सामन्याआधी क्वारंटाईनमधून बाहेर आले हे ३ दिग्गज खेळाडू
आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला…
या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार
ट्रेंडिंग लेख –
‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन