---Advertisement---

IPL 2024 साठी धोनीचा विंटेज लूक, लांब केसांसह फोटो सोशल मीडियावर व्हायरल

---Advertisement---

आयपीएल 2024 चा थरार सुरू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलमध्ये क्रिकेट चाहते महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंना खेळताना पाहण्यास उत्सुक आहेत.

सध्या सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनीचा विंटेज लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. धोनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या लुकमध्ये परतलाय. तो याच लुकसह आयपीएल स्पर्धेत खेळेल. धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्जनं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून धोनीचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये धोनी आयपीएलसाठी सराव करताना दिसतोय. फोटोमध्ये तो मानेपर्यंतच्या लांब केसांसह दिसतोय. सीएसकेनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं – ‘द व्हिन्टेज हेअर, द क्लासिक इमोशन, माही आ रहा है!’

आम्ही तुम्हाला सांगतो, चाहत्यांना धोनीचा लांब केसांचा लूक फार आवडतो. धोनीनं जेव्हा 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा त्याचा हा लूक खूप फेमस झाला होता. आता पदार्पणाच्या 20 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा या लुकसह मैदानात उतरणार आहे.

 

महेंद्रसिंह धोनी गेल्या अनेक वर्षांपासून सीएसकेचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वात चेन्नईनं पाच वेळा विजेतेपद पटकावलंय. त्यानं 2022 मध्ये कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर त्याच्या जागी फ्रँचायझीनं अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवलं. मात्र जडेजानं 8 सामन्यांनंतरच कर्णधारपद सोडलं. त्यानंतर पुन्हा धोनीला कर्णधार बनवण्यात आलं. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेनं 2023 चं विजेतेपद पटकावलं.

आयपीएल 2024 साठी सीएसके संघ – एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, महेश तिक्ष्णा, मिचेल सँटनर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, शेख रशीद, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, अजय मंडल, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रवींद्र, अवनीश राव अरवेली

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद दिसणार वेगळ्या रंगात, टीमची नवी जर्सी लॉन्च

अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान

महेंद्रसिंग धोनीच आयपीएल 2024 मध्ये असणार चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार, अशी असू शकते CSK ची संभाव्य प्लेइंग 11

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---