आयसीसीच्या 3 ट्रॉफी भारतीय संघाच्या पारड्यात टाकणारा माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्ती घेतल्यानंतरही चर्चेचा विषय ठरतोय. त्याने निवृत्ती घेऊन आता 2 वर्षे लोटली आहेत. तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी होत नाहीये, तर वाढतच चाललीये. तो सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच व्यस्त आहे, त्यामुळे तो क्रिकेटविश्वापासून सध्या दूर राहतो. मात्र, आयपीएलमध्ये तो क्रिकेटच्या मैदानावर उतरतो आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसतो. अशात तो आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेत येण्यामागील कारण जरा वेगळे आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) नुकताच देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत दिसला. यादरम्यानचे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांचे फोटो पाहून नेटकऱ्यांनीही प्रश्न विचारून टाकला की, “धोनी भाजप पक्षात सामील होणार आहे का?”
Will Dhoni bat again for Bharat. Will Dhoni join BJP to serve the nation once again. pic.twitter.com/DsgwB2cp2a
— ettirankandath (Modi Ka Parivar) (@ettirankandath) November 12, 2022
MS Dhoni meets India's Home Minister, Amit Shah. pic.twitter.com/aVqeaJZTvP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2022
काय होतं कारण?
खरं तर, एमएस धोनी आणि अमित शाह (MS Dhoni And Amit Shah) हे चेन्नईतील एका कार्यक्रमादरम्यान भेटले. यादरम्यान दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि स्मितहास्य देत एकमेकांची भेट घेतली. चेन्नईमध्ये इंडिया सिमेंट्सला 75 वर्षे (India Cements 75th Anniversary) पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि एमएस धोनी उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी एकमेकांची भेट घेतली.
खरं तर, इंडिया सिमेंट्सचे मालक एन श्रीनिवासन (N Srinivasan) आहेत. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले आहे. यासोबतच ते चेन्नई सुपर किंग्सचे सहमालकही आहेत.
सन 2018मध्येही अमित शाह आणि एमएस धोनी यांची भेट झाली होती. या भेटीनंतरपासूनच असे तर्कवितर्क लावले जाऊ लागले की, एमएस धोनी भारतीय जनता पक्षात सामील होऊ शकतो. मात्र, अद्याप धोनी राजकारणापासून दूर राहिला आहे. भारतीय संघाला आयसीसी टी20 विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा एमएस धोनी याची गणना भारताच्या दिग्गज कर्णधारांमध्ये होते.
एमएस धोनी आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची धुरा सांभाळताना दिसेल. (MS Dhoni meets Home Minister Amit Shah chennai India Cements 75th Anniversary see photos)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधता तुम्ही…’, भारताच्या इरफानने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर डागली तोफ, पण का?
आख्ख्या जगाने केले टीम इंडियाला ट्रोल, पण न्यूझीलंडच्या दिग्गजाकडून मिळाला सल्ला; म्हणाला, ‘धाडसी…’