भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (१० जुलै) खेळला गेला. इंग्लंडने भारतासमोर २१६ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र सुर्यकुमार यादवची तुफानी शतकी खेळी ही भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. पण तरीही या सामन्याचा खरा केंद्रबिंदू ठरला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांची भेट.
रविवारी ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या सामन्यात धोनी आणि शास्त्री यांच्यात स्टेडियमवर भेट झाली. त्यांच्या या भेटीचा फोटो शास्त्री यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर टाकला आहे. तर त्यापुर्वी दुसऱ्या टी२० सामन्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ही आपला धोनी सोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यावर्षी धोनीने आपला वाढदिवस पत्नी साक्षी आणि मित्रमंडळी सोबत इंग्लंडमध्ये साजरा केला.
Great to catch up with the maestro who looks in fine fettle – @msdhoni @SkyCricket @BCCI @ChennaiIPL #ENGvsIND 🇮🇳 pic.twitter.com/2WaBtV04Fk
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) July 10, 2022
(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)