आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘आयसीसी मेन्स वनडे प्लेअर ऑफ द डिकेड’ अर्थात ‘आयसीसी दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडू’ पुरस्कारासाठी जगातील ७ सर्वोत्तम खेळाडूंना नामांकित केले आहे. या ७ खेळाडूंमध्ये तीन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. ज्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावाचाही समावेश आहे. त्यानंतर इतर खेळाडूंमध्ये श्रीलंकेचे दोन आणि दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
‘आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडू’साठी या ७ खेळाडूंमधून होणार एकाची निवड
विराट कोहली- भारत, लसिथ मलिंगा- श्रीलंका, मिचेल स्टार्क- ऑस्ट्रेलिया, एबी डिविलियर्स- दक्षिण आफ्रिका, रोहित शर्मा- भारत, एमएस धोनी- भारत आणि कुमार संगकारा- श्रीलंका.
आयसीसीने निवड केलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीला पहिले स्थान देण्यात आले आहे, तर भारतीय उपकर्णधार रोहित शर्माला पाचवे स्थान देण्यात आले आहे. यानंतर सहाव्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे, तर सातव्या स्थानावर श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. संगकाराने २०१५मध्ये क्रिकेटला अलविदा केला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अन्य खेळाडूंपैकी या यादीत एमएस धोनी आणि एबी डिविलियर्सच्या नावाचाही समावेश आहे.
धोनीची वनडे कारकीर्द
एमएस धोनीने आतापर्यंत ३५० वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतकेही ठोकली आहेत. सोबतच त्याने ८२६ चौकार आणि २२९ षटकारही ठोकले आहेत.
तसेच मागील दशकात धोनीने १९६ वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये मिळून त्याने ५०.३५ च्या सरासरीने ५६४० धावा केल्या असून यात त्याच्या ४ शतकांचा आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने मागील दशकात ४३६ चौकार आणि ११९ षटकार मारले आहेत.
तो मागील दशकात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये १३ व्या क्रमांकावर आहे. अव्वल क्रमांकावर १११२५ धावांवर विराट कोहली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला रोहित आणि ईशांत मुकण्याची शक्यता
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांतील टीम इंडियाचे सर्वात मोठे ३ विजय
वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात