सध्या क्रिकेट जगतात ज्या खेळाडूची चर्चा क्रिकेट जगतात सर्वात जास्त होत आहे त्या भारताच्या माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावाची शिफारस भारतीय क्रिकेट बोर्डाने पद्मा भूषण पुरस्कारासाठी केली आहे.
पद्मा भूषण हा भारताचा सर्वोच्च तिसरा नागरी पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी धोनीच्या नावाची शिफारस ही त्याने या खेळात दिलेल्या योगदामुळे केली आहे. यावर्षी भारतीय क्रिकेट बोर्डाने यावर्षी पद्म पुरस्कारासाठी केवळ एकच नाव पाठवले आहे.
“एमएस धोनीची पद्मभूषणसाठी शिफारस करण्यात आली आहे. धोनीच्या नावावर सर्व सदस्यांमध्ये एकमत झाले होते. धोनीपेक्षा या पुरस्कारासाठी शिफारस करण्यायोग्य कोणताही खेळाडू नाही. ” बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
The @BCCI nominates @msdhoni for the prestigious Padma Bhushan award. #Cricket #PadmaAwards.
— Press Trust of India (@PTI_News) September 20, 2017
जर धोनीला पद्म भूषण पुरस्कार मिळाला तर हा पुरस्कार मिळणारा तो केवळ ११वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रोफेसर डीबी देवधर, सीके नायडू आणि लाला अमरनाथ या खेळाडूंचा समावेश आहे.