भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने २०२० मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. परंतु तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येतो. धोनीचा चाहतावर्ग भरपूर मोठा आहे. देश परदेशातील क्रिकेट चाहत्यांसह अनेक क्रिकेटपटूदेखील त्याला फॉलो करत असतात. परंतु जिथे समर्थक असतात तिथे ट्रोल करणारेही अनेक लोक असतात. धोनीलाही अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. परंतु शांत स्वभावाच्या धोनीने बऱ्याचदा ट्रोलर्सला प्रतिसाद दिला न दिल्याचे आपण पाहिले आहे. परंतु एकदा चाहत्याने धोनीला सल्ला दिला होता, ज्यावर धोनीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर ‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला एकदा एका चाहत्याने ट्विटरवर टॅग करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्या अज्ञात चाहत्याने धोनीला फलंदाजीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. हे ट्विट २०१२ सालचे आहे. जेव्हा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार होता. त्यावेळी धोनीने आपल्या ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर करत त्यांच्यातील अंतर ओळखण्यास सांगितले होते.
या ट्विटवर प्रतिसाद देत एका चाहत्याने लिहिले होते कि, ‘ट्विटरवर लक्ष न देता आपल्या फलंदाजीवर लक्ष दे.’ यावर प्रतिसाद देत धोनीने त्याला म्हटले होते कि, ‘हो सर, आणखी काही टिप्स सर.’
येत्या सप्टेंबर महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला पुन्हा एकदा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सूपर किंग्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच चेन्नई संघातील खेळाडू जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. आयपीएल स्थगित होण्यापुर्वी चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. चेन्नईने या हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. उर्वरित सामन्यांमध्ये चेन्नई संघ चांगली कामगिरी करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांसाठी खुशखबर, ‘ही’ अट पूर्ण केल्यास आयपीएल सामन्यांना मैदानात मिळणार प्रवेश
WTC Final: रोहित-शुबमनची सलामी जोडी भारतासाठी चिंतेचा विषय, माजी खेळाडूचे परखड मत
नको रे बाबा! ‘या’ गोलंदाजापुढे रनमशीन कोहलीलाही फुटायचा घाम, सर्वच फलंदाज होते त्रस्त