कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 15 एप्रिल 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने यापुर्वीच आयपीएलची जोरदार तयारी सुरु केली होती. तो चेन्नई शहरात दाखल होऊन सरावही करत होता.
त्याने काही सराव सामनेही खेळले होते. विशेष म्हणजे या सराव सामन्याला प्रेक्षक चांगलीच गर्दी करत होते. परंतु आयपीएलच पुढे ढकलल्यामुळे धोनीने चेन्नई शहर सोडले.
No day off for fitness freak MS Dhoni, as he resumes badminton session in Ranchi.😇🔥 #FitnessFreak #MSDhoni #Dhoni pic.twitter.com/z1ZDVHRkCa
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) March 16, 2020
यानंतर रांचीत परतलेला धोनी सध्या बॅटमिंटन खेळत आहे. यावेळी डबल्स प्रकारात धोनी ट्रॅकपॅंटमध्ये खेळताना दिसत आहे. धोनी हा नेहमीच फिटनेससाठी ओळखला जातो. रविवारी घरी परतल्यावर त्याने फिट रहाण्यासाठीच सराव सुरु केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोरोना व्हायरसमुळे सचिनचे विक्रम तोडण्याच्या विराटच्या मिशनला खिळ?
-टाॅप ५: मांजरेकरांसह इतिहासात हाकालपट्टी झालेले ५ समालोचक