चेन्नई सुपर किंग्सने ५ वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला ३ विकेट्सने धूळ चारली. या सामन्यात चेन्नईला विजयी बनवण्यात एमएस धोनीने मोलाचा वाटा उचलला. विसाव्या षटकात चेन्नईला १७ धावांची गरज होती. अशात धोनी संघासाठी तारणहार ठरला आणि त्याने शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार मारला. विशेष म्हणजे, ४० वर्षांच्या धोनीच्या या फटकेबाजीनंतर त्याने खास कारनामा करत रोहित आणि विराटला मागे टाकले.
या सामन्यात मुंबईने (Mumbai Indians) पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १५५ धावा चोपल्या होत्या. हे आव्हान चेन्नईने (Chennai Super Kings) शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. यामध्ये धोनीने नाबाद राहत अवघ्या १३ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांसह २८ धावांची बरसात केली. यासह एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएल २०२२मधील पहिल्या ७ सामन्यांनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीनंतर (Rohit Sharma) सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
धोनीने या हंगामातील ७ सामन्यांनंतर ६०च्या सरासरीने १२० धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ अर्धशतकही झळकावले आहे. विराट कोहलीचीही बॅट या हंगामात तळपताना दिसत नाहीये. विराटने आतापर्यंत या हंगामात खेळलेल्या पहिल्या ७ सामन्यांनंतर १९.८३च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. त्याला या हंगामात एकही अर्धशतक करता आले नाही. एका सामन्यात तो ४८ धावांवर बाद झाला होता. विशेष म्हणजे, विराटने मागील हंगामातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्धणारपद सोडले होते. त्यानंतर फाफ डू प्लेसिसला बेंगलोरने आपला नवीन कर्णधार बनवले. विराट जरी खराब फॉर्ममध्ये असला, तरीही बेंगलोर संघ चांगली कामगिरी करत आहे. ते ५ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत.
विराटव्यतिरिक्त दुसरीकडे रोहित शर्माने या हंगामात पहिल्या ७ सामन्यांनंतर १६.२९च्या सरासरीने ११४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याला एकही अर्धशतक करता आले नाहीये.
एमएस धोनीची आयपीएल कारकीर्द
एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २२७ सामने खेळले आहेत. यातील १९९ डावांमध्ये त्याने ३९.८९च्या सरासरीने ४८६६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २४ अर्धशतके झळकावली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माही मार रहा है! आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम तीन वेळा करणारा धोनी एकमेवच
याला काय अर्थय! धोनी अन् जडेजाच्या ‘या’ २ चुकांमुळे चेन्नईला करावा लागला विजयासाठी संघर्ष