भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाची सध्याची ‘रेट्रो जर्सी’ खूप आवडते. मात्र, या चाहत्यांला एकदा या जर्सीमध्ये माजी कर्णधार एमएस धोनीलादेखील पाहाण्याची इच्छा होती. परंतु, धोनी निवृत्त झाल्यानंतरच ‘रेट्रो जर्सी’ सुरू करण्यात आली. यामुळे चाहते खूप निराश झाले आणि त्यांनी फोटोशॉपच्या माध्यमातून धोनीने ‘रेट्रो जर्सी’ परिधान केल्याची छायाचित्रे बनवली होती. आता धोनीच्या चाहत्यांनी अशा फोटोशॉपचा अवलंब करावा लागणार नाही. कारण स्वत: धोनीने टीम इंडियाची रेट्रो जर्सी परिधान केलेली दिसून आले आहे.
सोमवारी (२७ जुलै) धोनीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, यामध्ये त्याने टीम इंडियाची रेट्रो जर्सी परिधान केली आहे.
या कारणासाठी घातली रेट्रो जर्सी
धोनीने एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी टीम इंडियाची रेट्रो जर्सी परिधान केली होती. धोनी सध्या मुंबईत आहे आणि नुकताच तो बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत फुटबॉल सामना खेळताना दिसला. धोनी भारतीय संघाच्या रेट्रो जर्सीमध्ये चांगलाच शोभून दिसत आहे. धोनीचे चाहते सोशल मीडियावर सांगत आहेत की, माहीला एकदा या रेट्रो जर्सीमध्ये पाहायचे होते आणि आता आमची ही इच्छा पूर्ण झाली. या छायाचित्रानुसार धोनी चांगला तंदुरुस्त दिसत आहे. (MS dhoni seen in team India retro jersey)
MS Dhoni in Retro Jersey ! Latest clicks..❤️
Oh God.. Such a beautiful day it is ????❤️ pic.twitter.com/NFAjcsLtBd
— The MSDian Girl ???? (@themsdiangirl7) July 26, 2021
We: OMG!! M.S. Dhoni in retro
Jersey: OMG!! I'm on M.S. Dhoni #MSDhoni pic.twitter.com/fyfbgLaFQ1— J.D???????? (@Mahi_Cool7) July 26, 2021
पुन्हा मैदानावर उतरेल धोनी
धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसेल. आयपीएलचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे. ज्याच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघ भिडतील. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२१ स्थगिती होईपर्यंत चमकदार कामगिरी बजावली होती. ते गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहेत. चेन्नईने ७ पैकी ५ सामने जिंकत १० गुण मिळवले आहे. गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये न पोहोचलेला चेन्नईचा संघ या हंगामात विजेतेपदासाठी मोठा दावेदार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही