2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आतापर्यंत क्रिकेट खेळताना दिसला नाही. 9 जुलैला मॅनचेस्टर येथे खेळण्यात आलेल्या उपांत्य सामन्यानंतर धोनीचे चाहते पुन्हा त्याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चाहत्यांची ही उत्सुकता खरी ठरण्याची शक्यता आहे.
रविवारी (16 फेब्रुवारी) आयपीएलने 2020 आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ज्यामधील पहिला सामना 29 मार्चला होणार आहे. या आयपीएल स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ 1 मार्चपासून चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर सराव सत्र सुरु करणार आहे. या सराव सत्रात धोनीही भाग घेणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “धोनी 1 मार्चपासून चेन्नईला येण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर तो आगामी 2 आठवड्यांच्या सराव सत्रात भाग घेईल. यानंतर तो 4-5 दिवसांची विश्रांती घेऊन आपल्या घरी जाईल. तसेच आयपीएलपूर्वी पुन्हा चेन्नईला येऊन सराव सत्रात भाग घेईल.”
आयपीएल 2020मध्ये चेन्नई सुपर किंग्स चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) 1 धावेने पराभूत झाला होता. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
यावर्षी आयपीएल 2020 मध्ये 29 मार्चला वानखेडे येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला सामना पार पडणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध सराव सामन्यात मयंक अगरवाल, रिषभ पंत चमकले
वाचा-👉 https://t.co/PpaFZRast4👈#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ @RishabhPant17— Maha Sports (@Maha_Sports) February 16, 2020
आयपीएल २०२०: असे आहे दिल्ली कॅपिटल्स वेळापत्रक; जाणून घ्या कधी व केव्हा होणार सामने
वाचा👉https://t.co/a1oXQwsm0O👈#म #मराठी #Cricket #IPL2020 @DelhiCapitals— Maha Sports (@Maha_Sports) February 16, 2020