---Advertisement---

पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी फॅमिली इमोशनल, झिवाची वडिलांना कडकडून मिठी, पाहा व्हिडिओ

MS Dhoni Ziva Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जने मिळवले. एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसके याचसोबत आयपीएल इतिहासात पाच वेळा विजेतेपद पटकावणारा दुसरा संघ बनला आहे. सीएसके आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांनी ही कामगिरी नावावर केली आहे. समोवारी (29 मे) झालेला हा सामना खऱ्या अर्थाने चित्तथरारक ठरला. शेवटच्या चेंडूवर चौकार मारून रविंद्र जडेजाने संघाला विजेतेपद मिळवून दिले. विजयानंतर धोनी आणि त्याचे कुटुंब भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासाठी हा शेवटचा आयपीएल हंगाम अशल्याचे अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याने स्पष्ट केले की, पुढच्या आयपीएल हंगामात खेळण्याचा त्याचा प्रयत्न असेल. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील हा अंतिम सामना रविवारी (28 मे) नियोजित होता. मात्र, ऐन वेळी पाऊस आल्यामुळे रविवारचा सामना सोमवारी (राखीव दिवशी) आयोजित करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सोमवारी देखील पावसाने हजेरी लावली होती. पण रात्री 12.10 वाजता खेळ पुन्हा सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार पंचांनी सीएसकेला विजयासाठी 15 षटकांमध्ये 171 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या चेंडूवर गाठले.

रविंद्र जडेजा () याने शेवटच्या दोन चेंडूंवर लागोपाठ षटकार आणि चौकार मारले आणि सामना नावावर केला. सामना संपल्यानंतर स्टॅन्डमध्ये उपस्थिती धोनीची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा (Ziva Dhoni) मैदानात आले. झिवाने आपल्या वडिलांना मिठी मारल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे साक्षीही चांगलीच भावूक झाली होती. आयपीएल शेअर केलेल्या एका व्हिडिओत झिवाने आयपीएल ट्रॉफी उचलल्याचेही पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सीएसकेला विजयासाठी दोन चेंडूंमध्ये 10 धााव हव्या होत्या, तेव्हा धोनी इतर कर्णधारांप्रमाणे चिंतेत दिसत नव्हता. तो डगआउटमध्ये आपल्या खुर्चीवर निवांत बसल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही, जडेजाने सामना जिंकवून दिल्यानंतरही काही वेळ तो त्याच ठिकाणी बसून होता. नंतर त्याने पुढे जाऊन जडेजाला उचलून घेतल्याचेही पाहायला मिळाले.  (MS Dhoni was given a big hug by his daughter Ziva after winning the IPL 2023 trophy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर अंबाती रायुडू भावूक, घरच्यांचे नाव घेत म्हणाला, ‘मी आता आयुष्यभर…’
नाव मोठं, लक्षण खोटं! कोट्यवधी रुपये घेऊनही ‘हे’ 5 स्टार खेळाडू फ्लॉपच, इंग्लंडच्या 3 पठ्ठ्यांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---