fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एमएस धोनी असताना मी प्रथमोपचार पेटी सारखा आहे – दिनेश कार्तिक

सोमवारी(15 एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या भारतीय संघात एमएस धोनीचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली.

याबद्दल कार्तिकने स्वप्न पुर्ण झाल्याचे सांगताना म्हटले आहे की तो धोनी असताना छोट्या प्रथोमपचार पेटी सारखा आहे.

काही पत्रकारांशी बोलताना कार्तिक म्हणाला, ‘या विश्वचषकात जेव्हा धोनीचा विषय आहे तेव्हा मी एका छोट्या प्रथोमपचार पेटी सारखा आहे, जो त्याच्याबरोबर असणार आहे. ज्यादिवशी धोनीला दुखापत होईल, तेव्हा मी बँडएड सारखा असेल.’

पण त्याचबरोबर तो भारताच्या मधल्या फळीतही फलंदाजी करु शकतो असे सांगताना कार्तिक म्हणाला, ‘पण मला हे देखील माहित आहे की मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो आणि फिनिशरची भूमीका निभावू शकतो. आयपीएलनंतर मी रोज तयारी करेल मला विश्वास आहे हे होऊ शकते. मला माहीत आहे मी ती भूमीका निभावू शकतो. कारण मी याआधी हे केले आहे.’

तसेच 2017 मध्ये त्याचे भारतीय संघात पूनरागमन झाले त्याचवेळी त्याला या विश्वचषकासाठी तो भारतीय संघाचा भाग असू शकतो असे वाटले होते. याबद्दल तो म्हणाला, ‘त्यावेळी मला वाटले होते की मी काही विशेष केले तर मी या खास संघाचा भाग असेल.’

कार्तिकला 12 वर्षांनंतर पून्हा एकदा विश्वचषकात निवड झाल्याची बातमी तो त्याची पत्नी दिपीका पल्लिकल-कार्तिक आणि कोलकता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसुर यांच्याबरोबर जेवण करत असताना कळाली. याबद्दल तो म्हणाला, ‘माझ्या सारऱ्यांनी दिपीकाला फोन केला, त्यावेळी मला पहिल्यांदा कळाले. त्यानंतर मला माझ्या पालकांचा फोन आला.’

याबरोबरच कार्तिकने त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाच्या यशात कोलकताचा अकादमी प्रशिक्षक असणाऱ्या अभिषेक नायरचा मोठा वाटा असल्याचे म्हटले आहे.

कार्तिक म्हणाला, ‘नायरने मला विश्वास दिला की माझ्यात सामना संपवण्याची क्षमता आहे. मला सरावाची गरज आहे. मला वेगवेगळे शॉट्स शिकण्याची गरज होती. असे असले तरी फिनिशर बनण्याची माझी योजना नव्हती. पण अशी परिस्थिती आली तर आम्ही यशस्वी होऊ असा विचार करत सराव केला. आम्ही एक सातत्यपूर्ण खेळाडू जो गरज असेल तेव्हा चांगली कामगिरी करु शकतो असे बनण्याची योजना आखली.’

कार्तिकची या विश्वचषकात रिषभ पंत ऐवजी निवड करण्यात आली. त्याबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला, ‘माझ्यासाठी कोणाला संधी गमवावी लागली याचा विचार मी करु शकत नाही. ही माझ्यासाठी चांगली कामगिरी करण्याची चांगली संधी आहे. पंत बद्दल सांगायचे तर मला माहित आहे तो खास खेळाडू आहे. मला वाटते तो बऱ्याच काळासाठी भारतीय संघाकडून खेळेल. तो, शुबमन गिल, पृथ्वी शॉ हे खास खेळाडू आहेत.’

‘मला माहित आहे मी त्याच्याबरोबरही विश्वचषकानंतर खेळू शकेल आणि मी त्याचाही आनंद घेईल. आम्ही याआधीही एकत्र खेळलो आहे. मला त्याच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो. मी जर धोनीबरोबर खेळू शकतो तर पंतबरोबर का नाही. मला माहित आहे आम्ही एकत्र खेळू.’

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकासाठी संघात निवड न झाल्याने रायडूने ट्विटरवरुन दिली अशी प्रतिक्रिया

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा डिविलियर्स दुसराच क्रिकेटपटू

विश्वचषकात या भारतीय क्रिकेटपटूला गोलंदाजी करण्याची लसिथ मलिंगाला वाटते भीती

 

You might also like