Loading...

व्हिडिओ:…म्हणून जॉन्टी ऱ्होड्सची झाली नाही फिल्डींग कोचसाठी निवड, प्रसाद यांचा खूलासा

गुरुवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समीतीने भारतीय संघासाठी सपोर्ट स्टाफची निवड केली आहे. यामध्ये क्षेत्ररक्षक प्रशिक्षकासाठी आर श्रीधर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

यावेळी क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिलेल्या उमेदवारांपैकी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होर्ड्स हे एक उमेदवार होते. मात्र त्यांची या पदासाठी अंतिम 3 उमेदवारांमध्येही निवड न करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

पण सपोर्ट स्टाफची निवड घोषित करताना जॉन्टी ऱ्होड्स यांची निवड न होण्यामागील कारण निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.त्यांनी सांगितले की ऱ्होड्स यांचा स्तर हा भारत अ आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील (एनसीए) क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांपेक्षा अधिक असल्याने त्यांची अंतिम 3 उमेदवारांमध्ये निवड करण्यात आली नाही.

तसेच आर श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण चांगले झाले असल्याने त्यांना पहिली पसंती मिळाली. 

प्रसाद म्हणाले, ‘ आम्हाला वाटते की जॉन्टी ऱ्होड्स हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी फिट नव्हते. कारण हे क्रमांक भारत अ संघासाठीच्या आणि एनसीएमधील प्रशिक्षकांच्या भूमीकेसाठी योग्य आहेत.’

Loading...

ऱ्होड्स यांनी याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद सांभाळले आहे. तसेच ते जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणले जातात.

तसेच श्रीधर यांच्याबद्दल प्रसाद म्हणाले, ‘आम्हाला श्रीधर यांच्या शैलीबद्दल खात्री आहे. ते सध्या जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांपैकी एक आहेत.’

‘दुर्दैवाने विश्वचषकात श्रीधर यांना हवा तसा निकाल मिळाला नाही. कारण संघात दोन यष्टीरक्षक खेळत होते आणि त्याप्रमाणेच संघ बांधणी होत होती. त्यांनी या संघाला एक चांगले क्षेत्ररक्षण करणारा संघ बनवला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा विचार नव्हता.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाला मिळाला नवीन बॅटिंग कोच, तर यांना मिळाली फिल्डींग, बॉलिंग कोचची जबाबदारी

जेव्हा जोफ्रा आर्चर करतो स्टिव्ह स्मिथच्या बॅटिंगची कॉपी, पहा व्हिडिओ

Loading...

विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया; रोहितला संधी नाही

You might also like
Loading...