मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात हरियाणाच्या तविश पाहवा याने तर, मुलींच्या गटात आनंदिता उपाध्याय या खेळाडूंनी दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित हरियाणाच्या तविश पाहवा याने मध्यप्रदेशच्या विवान बिदासरियाचा 6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या फजल अली मीर याने महाराष्ट्राच्या शौनक सुवर्णाचा 6-3, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुहेरीत अंतिम फेरीत तविश पाहवाने तक्षम सैनीच्या साथीत प्रणित चिट्टीपुदोरागरी व फझल अली मीरयांचा 6-4, 1-6, 10-4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत हरियाणाच्या अव्वल मानांकित आनंदिता उपाध्याय हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित पार्थसारथी मुंढेचा 6-4, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित ओडिशाच्या आहान हिने तिसऱ्या मानांकित हरियाणाच्या प्राची मलिकचा 6-3, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत अंतिम फेरीत आनंदिता उपाध्याय हिने हविशा चौधरीच्या साथीत प्राची मलिक व अहान यांचा 1-6, 7-6(7), 10-4 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, स्पर्धेचे संचालक व एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : एकेरी: उपांत्य फेरी: मुले:
तविश पाहवा(हरियाणा)[1] वि.वि.विवान बिदासरिया(मध्यप्रदेश) 6-2, 6-1;
फजल अली मीर(तामिळनाडू)[2]वि.वि.शौनक सुवर्णा(महाराष्ट्र) 6-3, 6-1;
मुली:
आनंदिता उपाध्याय(हरियाणा)[1] वि.वि.पार्थसारथी मुंढे(महाराष्ट्र)[10]6-4, 6-2;
आहान(ओडिशा)[2]वि.वि.प्राची मलिक(हरियाणा)[3]6-3, 6-1;
दुहेरी: उपांत्य फेरी: मुले:
प्रणित चिट्टीपुदोरागरी/फझल अली मीर[3] वि.वि.विराज चौधरी/कुशाग्र अरोरा[1] 7-5, 6-1;
तविश पाहवा/तक्षम सैनी[2] वि.वि.शिवा शर्मा/दिशेंदर लांबा[4]7-6(5), 6-0;
अंतिम फेरी: तविश पाहवा/तक्षम सैनी[2] वि.वि.प्रणित चिट्टीपुदोरागरी/फझल अली मीर[3] 6-4, 1-6, 10-4;
मुली:
आनंदिता उपाध्याय/हविशा चौधरी[1] वि.वि.सूर्यांशी शेखावत/नंदिनी कंसल[2]6-1, 6-3;
प्राची मलिक/अहान[2] वि.वि.पार्थसारथी मुंढे/एरवा रेड्डी 7-5, 6-1;
अंतिम फेरी: आनंदिता उपाध्याय/हविशा चौधरी[1] वि.वि.प्राची मलिक/अहान[2] 1-6, 7-6(7), 10-4.
महत्त्वाच्या बातम्या –
संपूर्ण यादी: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात सर्वाधिक पाँइंट्स मिळवणारे टॉप ५ रेडर्स आणि डिफेंडर्स
दबंग दिल्लीने पहिल्यांदाच जिंकले प्रो कबड्डीचे विजेतेपद, पाहा आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते संघ