नवी दिल्ली, १६ जून २०२३: भारताचा टेबलटेनिसपटू मुदित दानी याने स्वतःचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले आहे. नॅशनल कॉलेजिएट टेबल टेनिस असोसिएशन (NCTTA) तर्फे देण्यात येणारा अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. २०२२-२३ या वर्षातील सर्वोत्तम कामगिरीसाठी मुदितचा गौरव करण्यात आला आहे.
NCTTA ही अमेरिकन टेबल टेनिसची राष्ट्रीय संस्था सदस्य आहे आणि प्रत्येक हंगामाच्या शेवटी यूएसए आणि कॅनेडियन विद्यापीठांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरुष खेळाडूंना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. “NCTTA मेल अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार मिळणे, हा एक अतुलनीय सन्मान आहे आणि हा पुरस्कार जिंकणारा मी पहिला भारतीय आहे. कोणत्याही स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच सर्वात समाधानकारक गोष्ट असते,” असे मुदित म्हणाला.
महाराष्ट्राच्या या तरुणाने नुकतेच न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने दोन सुवर्णपदके जिंकून सलग दुसऱ्यांदा संघाला NCTTA राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यास मदत केली. त्याच्या अपवादात्मक कामगिरीमध्ये २०२२-२३ हंगामातील ११-० या विक्रमाचाही समावेश आहे. २४ वर्षीय खेळाडूने युएस ओपन चॅम्पियनशिपमध्ये २०१९ मध्ये त्याचे पहिले ITTF वरिष्ठ पदक जिंकले आणि गेल्या वर्षी USA मध्ये WTT स्पर्धेत दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. (Mudit Dani of Maharashtra created history, hoisted India’s tricolor; Became the first Indian to win the NCTTA Male Athlete of the Year award)
महत्वाच्या बातम्या –
ऍशेससाठी आयपीएल न खेळणारा संघातून बाहेर! ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
“विराटला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले”, माजी कर्णधाराचा मोठा आरोप