रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बुधवारी (०४ मे) आयपीएल २०२२चा ४९वा सामना खेळला गेला. उभय संघांमध्ये झालेला हा या हंगामातील दुसरा सामना होता. या सामन्यातील पहिल्याच षटकादरम्यान मोठा ड्रामा पाहायला मिळाला. चेन्नईच्या नव्या दमाचा गोलंदाज मुकेश चौधरी याने बेंगलोरचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला जोराने चेंडू फेकून मारला.
नाणेफेक जिंकून चेन्नईने (CSK vs RCB) या सामन्यात प्रथम गोलंदाजी निवडली. बेंगलोरकडून विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीला आले होते. चेन्नईकडून मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकात त्याने केवळ ६ धावा देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु त्याच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला.
चौधरीच्या या चेंडूवर विराटने सरळ फटका मारला. टप्पा घेऊन चौधरीच्या हातात हा चेंडू गेला. इतक्यात विराट तिकडून धाव घेण्यासाठी पळाला होता. चौधरीने विराटला धावताना पाहून त्वरित चेंडू यष्टीला मारला. हे पाहून विराट धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी माघारी फिरला. यामुळे चेंडू यष्टीला लागण्यासाठी विराटला (Mukesh Choudhary Hits Virat Kohli) लागला.
विराटला चेंडू लागल्याचे पाहून चौधरीने हात पुढे करत त्याची क्षमा मागितली. यावर विराटनेही हसत त्याला थम्स अप केले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान यापूर्वीही विराट आणि चौधरीता आमना सामना झाला होता. हंगामातील २२व्या सामन्यासाठी चेन्नई आणि बेंगलोर संघ आमने सामने होते. त्या सामन्यात चौधरीने विराटला शिवम दुबेच्या हातून १ धावेवर झेलबाद केले होते. आता या सामन्यात तो विराटची विकेट घेऊ शकला नाही. परंतु मोईन अलीने हे काम केले. डावातील दहावे षटक टाकताना मोईनने विराटला त्रिफळाचीत केले. विराट ३३ चेंडूंवर ३० धावा करून बाद झाला.
— India Fantasy (@india_fantasy) May 4, 2022
https://twitter.com/Cricupdates2022/status/1521855071944065024?s=20&t=1dB-m4Kq1aaTt285SBRQoA
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर– फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड
चेन्नई सुपर किंग्ज– ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महिश थिक्षाना
महत्त्वाच्या बातम्या-
तिलक वर्माने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य, कर्णधार रोहितच्या ‘या’ सल्ल्यामुळे मिळाली मदत
आरसीबीविरुद्धचा सामना धोनीसाठी खूपच खास, बनलाय चेन्नई सुपर किंग्सचा एकमेव ‘द्विशतकवीर’
टीम इंडिया बनली टी२० क्रिकेटची बॉस, वार्षिक क्रमवारीत अव्वलस्थानी; वनडे, कसोटीतील स्थान पाहा