आयपीएल 2023 साठी बीसीसीआयने शुक्रवारी (23 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. या लिलावात भारतीय आणि विदेशी दिग्गजांनी सहभाग घेतला होता. लिलावात मुकेश कुमार देखील सहभागी झाला होत, ज्याला त्याच्या बेस प्राईजपेक्षा 27.5 पट रक्कम मिळाली. दिल्ली कॅफिटल्सने त्याला संघात सामील करण्यासाठी लिलावात 5.50 कोटीची सर्वात मोठी बोली लावली आणि बोली जिंकली देखील. मुकेश कुमारने इथपर्यंत पोहचण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे.
आयपीएल 2023 पूर्वी बीसीसीआयने खेळाडूंचा हा लिलाव कोचीमध्ये आयोजित केला होता. मुकेश कुमार (Mukesh Kumar) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये या लिलावात सामील झाला होता. पण त्याला खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चढाओढ पाहायला मिळाला. परिणामी खेळाडूला आगामी आयपीएल हंगामात खेळण्याच्या बदल्यात तब्बल 5.50 कोटी रुपये मिळणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज मुकेश कुमारला खरेदी करण्यासाठी आमने सामने आले होते. मात्र अखेर दिल्लीने बाजी मारली आणि मुकेशला संघासोबत जोडले.
वडील चालवायचे रिक्षा
मुकेश कुमार मुळचा बिहारच्या जोपालगंजचा राहणारा आहे. क्रिकेट खेळण्यासाठी त्याने स्वतःचे घर सोडून कोलतात गाठले. त्याचे वडील कोलकात्यामध्येच रिक्षा चालवत होते. परिस्थिती प्रतिकूल असली, तरी मुकेशने मात्र माघार घेतली नाही. याचाच परिणाम म्हणून आता आयपीएल फ्रँचायझी त्याला खरेदी करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचे पडिलांनी 2019 मध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे अखेरचा श्वास घेतला. पण तरीही मुकेशने धीर सोडला नाही. तो रोजगार मिळावा या दृष्टीने नियमितपणे क्लब क्रिकेट खेळत असायचा. पण आता त्याचे चांगले दिवस आले, असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
2014 साली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल म्हणजेच कॅबच्या ट्रायलमध्ये पहिल्यांदा तो प्रकाशझोतात आला. त्यानंतर मुकेशचे दिवस बदलायला सुरुवात झाली आणि आज तो आयपीएलमुळे कोट्यावधींचा मालक बनला आहे. बंगाल संघासाठी त्याने रणजी क्रिकेट खेळले असून नुकतीच काही दिवसांपूर्वी भारत अ संघात देखील त्याची निवड झाली होती. भारत अ संघासोबत मुकेश बांगलादेश दौऱ्यावर घेला होता होता आणि त्याठिकाणी त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली. त्याने या दौऱ्यात एका डावात सहा विकेट्स घेतल्या. मुकेशने आतापर्यंत 33 प्रथम श्रेणी, 24 लिस्ट एक आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 123, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 26 आणि टी-20 मध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. (Mukesh Kumar was bought by Delhi Capitals for Rs 5.50 crore in the IPL auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या मिनी लिलावात ‘हे’ चार खेळाडू मालामाल, मिळाली 15 कोटींहून अधिक रक्कम
मूर्ती लहान कीर्ती महान! सॅम करन बनला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, पहिल्या पाचात एकच भारतीय