पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेत सोमवारी (२१ जून) क्वालिफायर सामना पार पडला. या सामन्यात मुल्तान सुलतान आणि इस्लामाबाद युनायटेड हे संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात मुल्तान सुलतान संघाने इस्लामाबाद संघाला ३१ धावांनी पराभूत करत पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
या सामन्यात मुल्तान सुलतान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना संघातील सलामी फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. कर्णधार मोहम्मद रिजवान भोपळाही न फोडता माघारी परतला होता. तर मक्सुदने २५ धावांचे योगदान दिले होते. तसेच सोहेब मक्सुद याने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. तसेच जॉन्सन चार्ल्सने शेवटी येऊन अवघ्या २१ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले होते. यादरम्यान त्याने ३ षटकार आणि ३ चौकार लगावले होते.
२० षटक अखेर मुल्तान सुलतान संघाला ५ बाद १८० धावा करण्यात यश आले होते. इस्लामाबाद युनायटेड संघाकडून गोलंदाजी करताना, शादाब खान आणि फहीम अशरफ यांना प्रतेकी २-२ गडी बाद करण्यात यश आले होते. (Multan Sultans qualified for psl finals)
मुलतान सुलतान संघाने दिलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना, उस्मान ख्वाजाने ७० धावांची तुफानी खेळी केली होती. या दरम्यान त्याने ९ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तर हुसेन तलतने २५ धावांचे योगदान दिले होते. इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी इस्लामाबाद युनायटेड संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
Red Hot squad losing steam as they lose the skipper @76Shadabkhan 🥵 #MatchDikhao l #HBLPSL6 I #IUvMS pic.twitter.com/ag1iUMGjpX
— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 21, 2021
He's dealing in just sixes! @RealJCharles is turning the game around! 🔄#HBLPSL6 | #MatchDikhao | #IUvMS pic.twitter.com/yQb4hs8SHk
— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 21, 2021
असा असेल पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेचा पुढील कार्यक्रम
२१ जून
२२ जून – इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध पेशावर जाल्मी (इलिमिनेटर २, रात्री ९:३० वाजता)
२४ जून – मुलतान सुलतान विरुद्ध इलिमिनेटर २ विजेता (अंतिम सामना, रात्री ९:३० वाजता)
महत्वाच्या बातम्या-
WTC अंतिम सामना अनिर्णीत राहिल्यास भारताचा मोठा तोटा तर न्यूझीलंड फायद्यात; बघा कसं?
आजच्याच दिवशी टीम इंडियाने खेळला होता विश्वचषकाचा ‘तो’ अजरामर सामना, संपूर्ण देशाला आलं होतं गहिवरुन
कसोटी अजिंक्यपदचा पहिलावहिला विजेता मिळण्यासाठी दिग्गजांनी सुचवले ‘हे’ समर्पक पर्याय