पुणे| पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी)यांच्या वतीने आयोजित ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत 9वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीअखेर आरुष डोळस, अद्वैय बेंडे, अविरत चौहान या खेळाडूंनी 2 गुणांसह आघाडी मिळवली.
मिलेनियम नॅशनल स्कुल, कर्वेनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 9वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत आरुष डोळसने अबीर पानसेचा, तर अद्वैय बेंडेने सुमेध पाटीलचा पराभव करत 2गुण प्राप्त केले. अविरत चौहानने राघव पांडेचा पराभव केला. महिला गटात राउंड रॉबिन फेरीत मृण्मयी बागवेने मानसी टिळेकरवर विजय मिळवला.
स्पर्धेचे उदघाटन ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, ट्रूस्पेसचे उल्हास त्रिमल, मिलेनियम स्कुलचे मुख्याध्यापक अन्वित पाठक, पीडीसीसीचे सचिव डॉ. संजय करवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, एएमसीएचे खजिनदार राजेंद्र कोंडे, चीफ आरबीटर विनिता श्रोत्री, हर्नीश राजा आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, याप्रसंगी नुकताच ग्रँडमास्टर हा मान पटकावणाऱ्या हर्षित राजाचा रोख पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन एमसीए व पीडीसीसी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
निकाल: 9वर्षाखालील मुली: पहिली फेरी:
चस्कार साळवे(0गुण) पराभूत वि.दित्या लोढा(1गुण);
दुर्वा चितळे(0गुण) पराभूत वि.ओवी पावडे(1गुण);
चतुर्थी परदेशी(1गुण) वि.वि.स्वरा दोडके(0गुण);
अद्विता इंगोळे(0गुण) पराभूत वि.वीरा फंड(1गुण);
प्रांजल राऊत(1गुण) वि.वि.काशवी राधाकृष्णन(0गुण);
9वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
आरुष डोळस(2गुण) वि.वि.अबीर पानसे(1गुण);
अद्वैय बेंडे(2गुण) वि.वि.सुमेध पाटील(1गुण);
राघव पांडे(1गुण) पराभूत वि.अविरत चौहान(2गुण);
अरिंजय पाटील(2गुण) वि.वि.आयुष चक्रावर(1गुण);
दर्श पोरवाल(1गुण) पराभूत वि.विहान देशमुख(2गुण);
17वर्षाखालील मुली: पहिली फेरी:
रिया मराठे(1गुण) वि.वि.सलोनी भंडारी(0गुण);
प्राची शिरुडे(0गुण) पराभूत वि.धनश्री खैरमोडे(1गुण);
मैथिली मिश्रा(0गुण) पराभूत वि.श्रेया जगदाळे(1गुण);
चिन्मयी कुरवाडे(0गुण) पराभूत वि.सिद्धी पाटील(1गुण);
महिला गट: राउंड रॉबिन(पहिली फेरी):
मृण्मयी बागवे(1गुण) वि.वि.मानसी टिळेकर(0गुण);
ईश्वरी गनबोटे(1गुण) वि.वि.मधुरा बार्शीकर(0गुण);
सोनम ठाकूर(1गुण) वि.वि.श्रद्धा डोंगरे(0गुण).