fbpx
Monday, January 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएसएल २०२०-२१ : ओगबेचेच्या गोलमुळे मुंबई सिटीचा एटीके मोहन बागानला शह

January 11, 2021
in टॉप बातम्या, फुटबॉल
0
Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC


गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील महत्त्वाच्या लढतीत मुंबई सिटी एफसीने एटीके मोहन बागानला 1-0 असे हरविले. नायजेरियाचा स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याने उत्तरार्धात केलेला गोल निर्णायक ठरला. आघाडीवरील मुंबई सिटीने दुसऱ्या क्रमांकावरील प्रतिस्पर्ध्याला हरविताना आपले अधिक्य पाच गुणांनी वाढविले.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात मुंबई सिटीच्या आघाडी फळीतील नायजेरियाचा 36 वर्षीय खेळाडू बार्थोलोम्यू ओगबेचे याने गोल केला. हाच गोल सर्जिओ लॉबेरा यांच्या संघासाठी निर्णायक ठरला. दुसरीकडे अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या संघासाठी गोलची समस्या कायम राहिली. त्यांचा हुकमी स्ट्रायकर रॉय कृष्णा याची नाकेबंदी करण्यात मुंबई सिटीने चोख कामगिरी बजावली.

सलामीला नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने धक्का दिल्यानंतर मुंबईने सलग चार विजय-एक बरोबरी-सलग चार विजय अशी यशोमालिका राखली आहे. मुंबई सिटीचा हा 10 सामन्यांतील आठवा विजय असून एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 25 गुण झाले. एटीके मोहन बागानला 10 सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला. सहा विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण व दुसरे स्थान कायम राहिले.

मुंबईचा गोलफरक तब्बल 13 झाला. त्यांनी 17 गोल केले असून त्यांच्याविरुद्ध चारच गोल झाले आहेत. एटीकेएमबीसाठी गोलची समस्या कायम राहिली. त्यांना दहा सामन्यांत दहाच गोल करता आले आहेत. हैदराबाद एफसी व एफसी गोवा यांचे प्रत्येकी 15 गुण आहेत. दोन्ही संघांचा गोलफरक 2 असा समान आहे. यात गोव्यापेक्षा दोन गोल जास्त केले असल्याने (15-13) हैदराबादचा तिसरा क्रमांक आहे.

मुंबई सिटीला अथक चालींचे फळ दुसऱ्या सत्रात मिळाले. बचाव फळीतील मंदार राव देसाी याने एटीकेएमबीचा मध्यरक्षक एदू गार्सिया याला चकवून आपल्या क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. मध्य फळीतील हर्नान सँटाना याला त्याने पास दिला. सँटनाने मग मध्य भागातून मुसंडी मारत बॉक्सलगत मध्यरक्षक ह्युगो बुमूस याला पास दिला. बुमूसने चेंडूवर ताबा मिळवित ओगबेचेला बॅकपास दिला. ओगबेचे एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला चकवून गोल केला.

सामन्याची सुरुवात चुरशीने झाली. मुंबई सिटीचा मध्यरक्षक सी गोडार्ड याने फ्री किकवर बॉक्समध्ये मारलेला फटका एटीकेएमबीचा स्ट्रायकर मानवीर सिंगला नीट रोखता आला नाही, पण बचाव फळीतील सहकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात राखली. पाचव्या मिनिटाला मुंबई सिटीचा मध्यरक्षक रॉलीन बोर्जेसने डावीकडे मध्यरक्षक बिपीन सिंगच्या दिशेने चेंडू मारला, पण एटीकेएमबीचा बचावपटू टिरी याने चेंडू बाहेर घालवला.

आठव्या मिनिटाला मुंबई सिटीचा मध्यरक्षक हर्नान सँटाना याने मध्य क्षेत्रात मध्यरक्षक ह्युगो बुमुसच्या पासवर घोडदौड केली. त्याने बचावपटू मंदार राव देसाईला पास दिला. त्यातून पुन्हा बुमुसला संधी मिळाली, पण त्याने मारलेला फटका एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने रोखला.

11व्या मिनिटाला मुंबई सिटीचा प्रयत्न थोडक्यात हुकला. बुमूसच्या चालीवर स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याने मारलेला फटका अरींदमने चपळाईने अडवला. 19व्या मिनिटाला मुंबई सिटीला आणखी एक संधी मिळाली. मंदारने डावीकडून मारलेला क्रॉस शॉट एटीकेएमबीचा बचावपटू संदेश झिंगन याने बाहेर घालवला. त्यामुळे मुंबई सिटीला कॉर्नर मिळाला, पण त्याने मारलेला चेंडू प्रतिस्पर्धी बचाव फळीने रोखला. 23व्या मिनिटाला मुंबई सिटीला उजवीकडे मिळालेला कॉर्नर गोडार्डने घेतला. त्यातून मिळालेला चेंडू बुमूसने बचावपटू अमेय रानवडे याच्या दिशेने फटकावला. अमेयचा क्रॉस शॉट अरींदमने अडवला.

25व्या मिनिटाला मानवीरने उजवीकडून आगेकूच केली, पण मंदारने कौशल्य पणास लावत चेंडू त्याच्या ताब्यातून मिळविला. मंदारने ओगबेचेला पास देण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिस्पर्धी मध्यरक्षक ग्लेन मार्टिन्सने झेपावत चेंडू थ्रो-इनसाठी बाहेर घालवला. 40व्या मिनिटाला एटीकेएमबीचा मध्यरक्षक जेव्हियर हर्नांडेझने उजवीकडे गोडार्डला पाडले. त्यामुळे मुंबई सिटीला फ्री किक देण्यात आली. गोडार्डनेच ती घेतली, पण त्याचा खराब फटका हर्नांडेझने आरामात अडविला.

दुसऱ्या सत्रात 53व्या मिनिटाला बुमूसने एटीकेएमबीचा स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याला पाडले. त्यामुळे एटीकेएमबीला फ्री किक देण्यात आली. गार्सियाने ती घेतली. त्याने नेटच्या दिशेने मारलेला फटका अमरींदरने उजवीकडे झेपावत रोखला. 58व्या मिनिटाला एटीकेएमबीचा बदली मध्यरक्षक प्रोणय हलदर याने ओगबेचेला चकवून चेंडूवर ताबा मिळविला. त्याने सहकारी मध्यरक्षक एदू गार्सियाला पास दिला. गार्सियाने डावीकडून चेंडू मारला, पण मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने चेंडू थोपवला.

सामन्याच्या अंतिम टप्प्यात गार्सियाने घेतलेल्या फ्री किकवर मुंबई सिटीच्या मुर्तडा फॉलने हेडिंगवर चेंडू थोपवला, पण त्यातून विल्यम्सला संधी मिळाली. विल्यम्सने मारलेला चेंडू फॉलने चपळाईने सावरत हेडिंगवरच बाहेर घालवला. भरपाई वेळेत गार्सियाने घेतलेल्या कॉर्नरवर टिरीने हेडिंग केले, पण ते स्वैर होते.

संबधित बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्ट युनायटेडची बेंगळुरूविरुद्ध लढत

आयएसएल २०२० : ब्लास्टर्सला धक्का देत ओदिशाचा पहिला विजय

आयएसएल २०२०-२१ : थरारक लढतीत ईस्ट बंगाल-गोवा यांची बरोबरी


Previous Post

सिडनीतील सामन्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपची रस्सीखेच झाली आणखीनच मजेशीर, भारत आणि न्यूझीलंड मध्ये केवळ ‘इतकाच’ फरक

Next Post

भारतीय संघ ‘या’ एका अटीवर ब्रिस्बेन येथे कसोटी सामना खेळण्यात तयार

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@cricbaroda
टॉप बातम्या

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

“ऑस्ट्रेलियाने डाव लवकर घोषित करायला हवा होता”, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केली टीका

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

January 18, 2021
Screengrab: Twitter/ cricketcomau
क्रिकेट

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

January 18, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

भारतीय संघ 'या' एका अटीवर ब्रिस्बेन येथे कसोटी सामना खेळण्यात तयार

Photo Courtesy: Twitter/ ICC

टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का! जडेजापाठोपाठ 'हा' खेळाडू देखील ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर

Photo Courtesy: Twitter/ imVkohli

Soo क्यूट ना..! सोशल मीडियावर व्हायरल होतोय 'विरुष्का'च्या मुलीचा पहिला फोटो? तुम्हीही पाहा...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.