fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मुंबई शहरची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १२ ऑक्टोबरपासून सुरू

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत, मुंबई शहर कबड्डी असो.आयोजित पुरुष, महिला, कुमार(मुले-मुली), किशोर(मुले-मुली) गट “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी” कबड्डी स्पर्धा दि.१२ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

वडाळा-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिर या पटांगणात होणाऱ्या या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई शहरचे प्रातिनिधिक संघ निवडले जातील.

या स्पर्धेचे “प्रवेश अर्ज” सर्व संलग्न संघांना रवाना करण्यात आले आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत शनिवार दि.५ ऑक्टोबर २०१९ असून त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी सायं. ७-०० ते ८-३० या वेळेत कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी या पत्राद्वारे माहिती दिली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

परदीप नरवालच्या सर्वात मोठ्या विक्रमाला दे धक्का, पवन शेरावतने घडवला इतिहास

विश्वशांती क्रीडा मंडळ व शिवशक्ती महिला संघाचा शिवनेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

You might also like