मुंबई: मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या मुंबई टप्प्यात आज एकच सामना झाला. किमया राणेच्या खेळीने १६ वर्षांखालील मुली गटातील लढतीत नॅशनल इंग्लिश हायस्कूल संघाला विजय मिळवून दिला. नॅशनल इंग्लिश हायस्कूल संघाने ९० धावांनी कांदिवलीच्या ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल संघावर विजय मिळवला.
वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या लढतीत नॅशनल इंग्लिश हायस्कूल संघाने २२ षटकांत ५ बाद २२३ धावा केल्या. किमया राणे आणि खुशी निजाई यांनी अनुक्रमे ३४ व ३२ धावांची खेळी केली. नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या फलंदाजांनी १० च्या सरासरीने धाका चोपल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल संघ २३.४ षटकांत १३३ धावांवर गडगडला. नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या गोलंदाजांनीही त्यांची जबाबदारी चोख बजावली. किमया राणेने १ विकेट घेत अष्टपैलू कामगिरीसह सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला.
संक्षिप्त धावफलक
१६ वर्षांखालील मुली
नॅशनल इंग्लिश हायस्कूल २२ षटकांत ५ बाद २२३ ( किमया राणे ३४, खुशी निजाई ३२) वि. वि. ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल ( कांदिवली) २३. ४ षटकांत सर्वबाद १३३; ९० धावांनी विजय, सर्वोत्तम खेळाडू – किमया राणे ( ३४ धावा आणि १ विकेट्स)