भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या पहिल्या वुमेन्स प्रीमियर लीग या टी20 स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसातच स्पर्धेने प्रसिद्धीचे अनेक उच्चांक मोडले आहेत. या सर्वात मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या एका युवा खेळाडूने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर दिवसभर तिचीच चर्चा सुरू राहिली.
https://twitter.com/prof_oak123/status/1632305411717054465?t=JG4WyZQ7i6qlQik9lDhaCQ&s=19
मुंबई इंडियन्सने आपल्या पहिल्या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवताना गुजरात जायंट्सला एकतर्फी सामन्यात 143 धावांनी पराभूत केले. संघाच्या या विजयात अष्टपैलू एमेलिया कर हिने महत्त्वाचे योगदान दिले. तिने 25 चेंडूवर 44 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीला आल्यावर तिने दोन षटके टाकताना 12 धावा देत दोन बळी टिपले. विशेष म्हणजे यात एक निर्धाव षटक सामील होते. तिच्या या खेळापेक्षा सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची जास्त चर्चा झाली.
Boys went from smriti mandhana to Amelia kerr pic.twitter.com/LqTJYqXHLM
— Ansh Shah (@asmemesss) March 5, 2023
तिची सामन्यादरम्यानची तसेच त्याआधी झालेल्या बातचीतीची काही छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. यामध्ये तिचे हास्य सर्वांना मोहित करून गेले. अनेकांनी तिला आपली नवीन क्रश म्हटले. तर, काहींनी ती भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना व ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी यांच्यापेक्षाही सुंदर असल्याचे म्हटले.
कर तिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करते. सध्या 22 वर्षांची असलेली कर 2016 पासून न्यूझीलंड संघात खेळत आहे. तिने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले. वुमेन्स प्रिमियर लीग लिलावात मुंबई इंडियन्सने तिच्यावर एक कोटींची बोली लावत तीला आपल्या संघात सामील करून घेतले. एका आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात द्विशतक आणि पाच बळी मिळवणारी ती क्रिकेट जगतातील एकमेव क्रिकेटपटू आहे.
तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 59 वनडे व टी20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 1362 व 657 धावा केल्या. तर, वनडेत 77 व टी20 मध्ये 59 बळी तिच्या नावे जमा आहेत.
(Mumbai Indians Amelia Kerr Becomes Crush Of Millions After WPL First Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप
चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, द बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश