यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या मेगा स्पर्धेची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. या स्पर्धेचा फायनल सामना (9 मार्च) रोजी खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर आयपीएल (IPL 2025) सुरू होईल. पण बीसीसीआयने (BCCI) अद्याप आयपीएलच्या 18व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु क्रिकबझच्या अहवालानुसार, आगामी हंगाम (22 मार्च) पासून सुरू होईल. दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) त्यांच्या पहिल्या सामन्यात कोणत्या संघाला आव्हान देईल? हे देखील आता उघड झाले आहे.
अहवालानुसार, 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा चेन्नईचा संघ आयपीएल 2025 मध्ये आपला पहिला सामना चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) खेळेल. हे दोन्ही संघ (23 मार्च) रोजी चेन्नईचे होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा सामना संध्याकाळी खेळवला जाईल.
आयपीएल 2025च्या पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आमने-सामने असतील. हा सामना केकेआरचे होम ग्राउंड ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) होणार आहे. स्पर्धेतील दुसरा सामना (23 मार्च) रोजी शेवटच्या हंगामातील उपविजेता सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात दिवसा खेळला जाईल. हा सामना हैदराबादचे होम ग्राउंड, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे.
आयपीएलच्या 18व्या हंगामात काही संघांचे कर्णधारही बदलतील. केकेआरने अद्याप आपला नवीन कर्णधार जाहीर केला नाही. त्यांचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यावेळी पंजाब किंग्जचे (Punjab Kings) नेतृत्व करणार आहे. त्याच वेळी, लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) डावखुरा फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तर आरसीबीने युवा फलंदाज रजत पाटीदारवर (Rajat Patidar) विश्वास दाखवत त्याच्याकडे कर्णधारपदाची सूत्र दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषकाइतकीच स्पर्धात्मक का? जाणून घ्या प्रमुख कारणे
3-0 ने हरलो तरी हरकत नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला हरवू इंग्लंडच्या बेन डकेटच मोठं वक्तव्य
बाबर आझमच्या इंग्रजीवर ताशेरे, दक्षिण अफ्रिकेच्या दिग्गजाने केली गमतीदार टिपणी!