fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वयाची तिशी पुर्ण केलेला मुंबईकर लढतोय टीम इंडियाकडून एक सामना खेळण्यासाठी

September 15, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)… क्रिकेट जगतातील कित्येक स्पर्धेंच्या गर्दीतही या टी२० लीगने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या लीगने कित्येक क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवली आहे. हार्दिक पंड्या या भारतीय अष्टपैलू खेळाडूला त्याच्या आयपीएलमधील प्रदर्शनामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आज तोच खेळाडू जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो.

आयपीएलमध्ये असाच एक दमदार भारतीय खेळाडू आहे, जो त्याच्या संघाचा मधल्या फळीतील मुख्य आधारस्तंभ आहे. सोबतच तो गरजेनुसार गोलंदाजीदेखील करु शकतो. हा खेळाडू म्हणजे, रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा ‘सुर्याकुमार यादव’.

१४ सप्टेंबर १९९० रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई या शहरातील एका मध्यम वर्गीय कुटुंबात यादवचा जन्म झाला. मुळात त्याच्या कुटूंबीयांचं मुळ गावं होतं  तमिळनाडूमधील गाझीपूर. पण त्याचे वडील अशोक कुमार यादव हे मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणु ऊर्जा विभागात नोकरीला लागलेव मुंबई शहरातच स्थायिक झाले.

यादवला लहान असल्यापासून क्रिकेटचे वेड होते. याविषयी बोलताना यादवचे लहानपणीचे क्रिकेट प्रशिक्षक अशोक सावळकर यांनी एकदा सांगितले होते की, “यादव जेव्हा पहिल्यांदा अकादमीच्या मैदानावर आला होता, तेव्हा तो फक्त ८-९ वर्षांचा होता. मैदानावर सराव करत असणाऱ्या खेळाडूंनी मारलेले चेंडू पकडून तो त्यांना आणून देत असायचा. असेच एकदा नेट्समध्ये सराव करताना त्याला अशोक कामत सरांनी पाहिले होते.”

“तेव्हा ते म्हणाले होते की, हा मुलगा वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत सुरुवातीलाच ५०-६० धावांच्या दमदार खेळी करेल. काही वर्षांनी कामत यांच्या वक्तव्याला यादवने खरे केले. त्याने मुंबईच्या क्रॉस मैदानावर झालेल्या एका सामन्यात केवळ ४०-४५ चेंडूत १४० धावांची अफलातून खेळी केली.”

मुंबईच्या या ढाण्या वाघाने २०१० साली देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. ११ फेब्रुवारी २०१० रोजी विजय हजारे ट्रॉफीत गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यातून त्याने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणातच ४१ धावा कुटणाऱ्या यादवला देशांतर्गत क्रिकेटमध्ये लवकरच प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. त्या सामन्यानंतर अगदी एका महिन्यातच त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील हैद्राबादविरुद्धच्या सामन्यातून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तर त्याचवर्षी डिसेंबरमध्ये त्याच्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटचीही दारे खुली झाली.

यादवने वयाच्या केवळ २१व्या वर्षी म्हणजे २०११-१२मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी केली होती. देशांतर्गत स्तरावरील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद १३४ इतकी आहे. अशी दमदार प्रतिभा असणारा खेळाडू जास्त दिवस निवडकर्त्यांच्या नजरेतून लपणार नव्हता. जरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळाले नसले, तरी जगप्रसिद्ध अशा आयपीएलचा तो भाग आहे.

आयपीएलच्या ५व्या हंगामात सर्वात यशस्वी अशा मुंबई इंडियन्स संघाने २०१२मध्ये प्रथम यादवला ताफ्यात दाखल केले होते. मुंबईने तब्बल ३ लाख २० हजार रुपयांची बोली लावत त्याला विकत घेतले आणि तिथून यादवच्या क्रिकेट कारकिर्दीला चार चाँद लागले. परंतु मुंबईकडून सुरुवातीच्या २ वर्षात त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही आणि अखेर २०१४ साली त्याला संघातून बाहेर केले. पण, त्याचवर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याची निवड केली.

आता पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी यादवला मिळाली होती आणि आता तो थांबणारही नव्हता. त्याने २०१४ ते २०१७ दरम्यान केकेआरकडून ५४ सामने खेळले आणि ६०८ धावा आपल्या खात्यात नोंदवल्या. यादवचा हा जबरदस्त फॉर्म पाहून मुंबईने परत २०१८मध्ये त्याला विकत घेतले. यावेळी यादव इतका जबरदस्त खेळला की, तो ५१२ धावा करत २०१८मध्ये सर्वाधिक धावा करणारा मुंबई इंडियन्सचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्यावेळी रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड यांच्या धावा सुर्याकुमारच्या धावांपेक्षा खूपच कमी होत्या.

एवढ्यावरच यादवची गाडी थांबली नाही. तर त्याने गतवर्षी मुंबई इंडियन्सला चौथे जेतेपद मिळवून देण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याने या पूर्ण हंगामात १६ सामन्यात ४२४ धावा केल्या होत्या. यासह तो क्विंटन डी कॉकनंतर (५२९) मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा दूसरा फलंदाज ठरला होता.

मुंबई इंडियन्सच्या या शिलेदाराचा काल (१४ सप्टेंबर) ३०वा वाढदिवस होता. आजही तो भारतीय संघात पदार्पणाची वाट पहात आहे. क्रिकेट वर्तुळात त्याची सतत चर्चा होत असते. तब्बल ७७ प्रथम श्रेणी व १४९ अ दर्जाचे सामने खेळलेल्या या प्रतिभावान खेळाडूला अजूनही भारतीय संघात संधी न मिळाल्याची चर्चा नेहमीच मुंबई व भारतीय क्रिकेट वर्तुळात होते. अपेक्षा करुयात की येणाऱ्या काही महिन्यांत त्याची ही प्रतिक्षा संपेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुर्या…!!!

ट्रेंडिंग लेख –

सहाव्या क्रमांकाचा फलंदाज सलामीवीर बनला आणि इतिहास घडवला

४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय

एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!

महत्त्वाच्या बातम्या –

हिटमॅन रोहित शर्माने दिले संकेत; हा खेळाडू लवकरच खेळू शकतो टीम इंडियाकडून

दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार जिममध्ये घेतायेत मेहनत; फोटो केले शेअर…

टीम इंडियाच्या या खेळाडूच्या पत्नीला हवीय सुरक्षा, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका…


Previous Post

विश्वचषकात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघावर असा विश्वास पुर्वी कुणी दाखवला नसेल…

Next Post

पंजाबी मुंडा शिखर धवन शिकवतोय लाजाळू अजिंक्य रहाणेला भांगडा, पहा व्हिडीओ…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

January 20, 2021
Next Post

पंजाबी मुंडा शिखर धवन शिकवतोय लाजाळू अजिंक्य रहाणेला भांगडा, पहा व्हिडीओ...

Photo Courtesy: Twitter/ KKRiders

आंद्रे रसेलवर अवलंबून आहे कोलकाता नाइट रायडर्सचा संघ; यंदाही दिनेश कार्तिकची परीक्षा

Photo Courtesy: Twitter/IPL

बंदे मे दम है! 'त्या' सामन्यात विराटला खेळताना पाहून मुंबईचा कर्णधार झाला होता अवाक्

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.