मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 हंगामातील आपला 9 वा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. आयपीएल इतिहासातील या 1000 व्या सामन्यात राजस्थानने 212 धावा केल्या. रविवारी आपला वाढदिवस साजरा करत असलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या खास दिवशी रोहित पुन्हा एकदा अपयशी ठरला.
रविवारी (30 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात उतरताच रोहित याने मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामने खेळणारा क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. हा त्याचा मुंबईसाठी 190 वा सामना होता. तसेच मुंबईचा कर्णधार म्हणून देखील त्याने 150 व्या सामन्यात हजेरी लावली. हा आयपीएल इतिहासातील 1000 वा सामना असल्याने या सामन्याला मोठे वलय प्राप्त झाले होते.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 213 धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. मात्र, बर्थडे बॉय कर्णधार रोहित शर्मा हाच अपयशी ठरला. दुसऱ्याच षटकात संदीप शर्मा याने त्याचा त्रिफळा उडवला. रोहित पाच चेंडूंवर केवळ तीन धावा करू शकला.
आपल्या वाढदिवशी सामना खेळत असताना रोहित अपयशी होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तीन सामने खेळले होते. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी खेळताना तो 17 धावांवर बाद झालेला. 2014 ला तो एकाच धावेवर बाद झाला होता. मागील वर्षी देखील राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना त्याला केवळ दोन धावा करता आल्या होत्या. त्यामुळे रोहित वाढदिवसाच्या दिवशी अपयशीच ठरत असल्याचे स्पष्ट होते.
(Mumbai Indians Captain Rohit Sharma Again Flop On His Birthday)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचा 1000 वा सामना जयस्वालने बनवला अविस्मरणीय! वानखेडेवर खेळली 124 धावांची ऐतिहासिक खेळी
रोहित शर्माला आयपीएलमध्ये हवे होते ‘या’ संघाचे कर्णधारपद, जुन्या सहकारी खेळाडूचा मोठा दावा