मंगळवार (13 एप्रिल) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि ऑएन मॉर्गनच्या कोलकाता नाइट रायडर्स संघात आयपीलए 2021 चा पाचवा समाना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून केकेआरचा कर्णधार मॉर्गनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करमाऱ्या मुंबई संघाने 20 षटकांत सर्व गडी गमावत 152 धावा केल्या.
यानंतर जेव्हा कोलकाताचा संघ लक्ष्याचा पाठलाग करीत होता, तेव्हा मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा एका षटकात गोलंदाजी करायला आला. परंतु षटकातील पहिला चेंडू फेकण्यापूर्वीच तो अडचणीत आल्याचे जाणवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने 13 षटकांत 3 गडी गमावून 104 धावा केल्या होत्या. तेव्हा मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा स्वत: 14 व्या षटकात गोलंदाजी करण्यास आला. परंतु पहिला चेंडू टाकण्याअगोदरच त्याचा डावा पाय अचानक मुरगळल्याने तो वेदनेने कळवळू लागला. त्यानंतर मुंबई संघाच्या वैद्यकीस टीमला मैदानात यावे लागले. मात्र, नंतर रोहितने आपले षटकही पूर्ण केले आणि शेवटपर्यंत सामना खेळला.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1382024984730558465?s=20
या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या मुंबई संघाने सूर्यकुमार यादवच्या 56 धावा आणि कर्णधार रोहित शर्माच्या 43 धावांच्या जोरावर 20 षटकांत सर्व गडी गमावून 152 धावा केल्या. यामध्ये कोलकाता संघाच्या आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजी करत 2 षटकांत केवळ 15 धावा देऊन 5 गडी बाद केले.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्याकरीता उतरलेला कोलकाता संघ एकावेळी मजबूत परिस्थितीत असल्याचे दिसून आले. परंतु मुंबईच्या राहुल चाहरने शानदार गोलंदाजी करत एकूण 4 गडी बाद करुन केकेआरला पिछाडीवर आणले. कोलकाता संघातील नितीश राणाच्या 56 धावा आणि शुभमन गिलच्या 33 धावांच्या खेळीशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजांना दुहेरी आकडासुद्धा गाठता आला नाही.
त्यामुळे शेवटी कोलकाताचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 142 धावा करू शकल्याने त्यांना दहा धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राहुल चाहरला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
हाताचे बोट तुटलेले असूनही केकेआरच्या गोलंदाजाने रोहित-इशानला धाडलं तंबूत, जाणून घ्या कसा झालता अपघात
रोहितचे अर्धशतक हुकले पण केला ‘हा’ मोठा कारनामा; आता केवळ विराट आणि रैना आहेत पुढे
मुंबई इंडियन्सने केलेल्या ‘त्या’ ट्विटने जिंकले मराठी चाहत्यांचे मन; पाहा असं काय लिहिलं होतं