भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी (६ मार्च) आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे (IPL 2022 Schedule) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगचा आगामी हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ २७ एप्रिलपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यांचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (MIvDC) विरुद्ध होईल. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईला यावेळी आपले विक्रमी सहावे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. कारण, त्यांना आपले सर्व सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. त्यामुळे संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील आनंदी आहे.
कोरोनामूळे मुंबईचा फायदा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) आगामी हंगाम मुंबई आणि पुण्यातील ४ स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार आहे. यादरम्यान, ७० लीग सामन्यांव्यतिरिक्त, चार प्ले-ऑफ सामने होतील. आयपीएलचा हा हंगाम एकूण ६५ दिवस चालणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डॉ. डी.वाय पाटील स्टेडियम व ब्रेबॉर्न स्टेडियम येथे तर, पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळवला जाईल. त्यामुळे घरच्या परिस्थितीचा मुंबई संघाला नक्कीच फायदा होईल. मुंबईचा संघ वानखेडे स्टेडियम व डी वाय पाटील स्टेडियम येथे प्रत्येकी चार सामने खेळेल. तर, ब्रेबॉर्न स्टेडियम व गहुंजे स्टेडियम येथे मुंबईच्या प्रत्येकी तीन सामन्यांचे आयोजन केले जाईल.
अ गटात आहे मुंबई
गतवर्षी प्ले ऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईला यावेळी आपली कामगिरी उंचावण्याची संधी असेल. गुजरात टायटन्स व लखनऊ सुपरजायंट्स हे दोन संघ नव्याने आयपीएलमध्ये सामील झाल्याने स्पर्धा या वेळी दोन गटात खेळली जाईल. अ गटामध्ये मुंबई इंडियन्ससह कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स व लखनऊ सुपरजायंट्स हे संघ आहेत.
आयपीएल २०२२ साठी मुंबई इंडियन्स संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टिळक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन.
महत्वाच्या बातम्या-
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर (mahasports.in)
नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात (mahasports.in)