कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा ५६वा सामना कोलकाताने ५२ धावांनी जिंकला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने १० धावा देत ५ विकेट्स घेतल्या आणि कोलकाताला १६५ धावांवर रोखले. परंतु प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली. इशान किशनव्यतिरिक्त एकही फलंदाज साधे अर्धशतकही करू शकला नाही आणि मुंबईचा संघ १७.३ षटकातच ११३ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी त्यांनी ५२ धावांनी हा सामना गमावला.
कोलकाताविरुद्धच्या (MI vs KKR) या सामन्यात मुंबईच्या ३ खेळाडूंनी खूपच वाईट प्रदर्शन केले. हे खेळाडू संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण (Mumbai Indians Defeat) ठरले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कायरन पोलार्ड-
कोलकाताच्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने अवघ्या ८३ धावांवर ४ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. अशात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कायरन पोलार्डकडून (Kieron Pollard) संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु त्याने सर्वांची निराशा केली. १६ चेंडूंमध्ये १५ धावा करून तो धावबाद झाला. आपल्या संथ फलंदाजीव्यतिरिक्त गोलंदाजीतही पोलार्डने खराब प्रदर्शन केले. २ षटके गोलंदाजी करताना त्याने तब्बल २६ धावा खर्च केल्या आणि यादरम्यान तो एकही विकेट घेऊ शकला नाही.
रिले मेरेडिथ-
वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथ (Riley Meredith) मुंबईसाठी सर्वात मोठा खलनायक ठरला. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेतली नाही. कोलकाताच्या फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध खोऱ्याने धावा काढल्या. त्याच्या या महागड्या गोलंदाजीचा परिणाम मुंबई संघाला पराभवाच्या रूपात झेलावा लागला आहे.
रमनदीप सिंग-
मुंबईचा फॉर्मात असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्यामुळे कोलकाताविरुद्ध खेळू शकला नाही. अशात त्याच्याजागी रमनदीप सिंगला (Ramandeep Singh) संधी दिली गेली होती. परंतु तो संघाच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर तो धावा करण्यासाठी झगडताना दिसला. संघाला वेगाने धावा करण्याची गरज असताना त्याने संथ खेळी केली. त्याने १६ चेंडू खेळताना केवळ १२ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्ठानचा धाकड फलंदाज हेटमायर बनला ‘बाप’माणूस, गोंडस व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजीत मुंबईची घसरगुंडी, संतापलेल्या रोहितने ‘यांना’ ठरवले पराभवाचे जबाबदार