इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात आत्तापर्यंत पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक अपयशी ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२२ हंगामात पहिल्या आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे संघाला टीकेचा सामना करावा लागत आहे. पण असे असले तरी, आता संघात एका नव्या खेळाडूचे आगमन होणार आहे.
मुंबई इंडियन्सने २४ वर्षीय कुमार कार्तिकेय सिंग याला करारबद्ध केले आहे. त्याला मोहम्मद अर्शद खान याच्या जागेवर संधी दिली आहेय मोहम्मद अर्शद खान हा दुखापतीमुळे आयपीएल २०२२ हंगामातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी २० लाखांच्या किंमतीत कुमार कार्तिकेय सिंग याला मुंबई इंडियन्सने संधी दिली आहे.
मध्यप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो कार्तिकेय
मुंबई इंडियन्सने संधी दिलेल्या कुमार कार्तिकेय सिंगने २०१८ साली मध्यप्रदेशकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ९ प्रथम श्रेणी, १९ अ दर्जाचे आणि ८ टी२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३५ विकेट्स, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १८ विकेट्स आणि टी२० क्रिकेटमध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचा नेट गोलंदाज
कुमार कार्तिकेय सिंग हा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा भाग होता. त्याने नेटमध्ये गोलंदाजीही केली आहे. आता त्याच्या कौशल्यावर प्रभावित होत मुंबई इंडियन्सने त्याला मुख्य संघाचा भाग बनवला आहे. कुमार कार्तिकेय फिरकी गोलंदाज आहे.
मुंबईला पहिल्या विजयाची अपेक्षा
मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत ८ पैकी सर्व सामने पराभूत झाले आहेत. आता मुंबईला ९ वा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध ३० एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नवी मुंबई येथे होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
दोन वर्षांची मेहनत फळाला आली; शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत मॅच जिंकवणाऱ्या राशिदची प्रतिक्रिया
Video: आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजी करत असलेल्या शशांकची घातक बॉलर फर्ग्युसनविरुद्ध षटकारांची हॅट्रिक
राशिद खानने यान्सेनला षटकार खेचल्यानंतर चांगलाच भडकला मुरलीधरन; डगआऊटमध्येच घातला राडा