मुंबई । मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आजपासून १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली. शाश्वत कपूर, अर्जुन जैस्वाल यांनी शतकी खेळी करताना १६ वर्षांखालील मुले गटाच्या सामन्यांची दणक्यात सुरूवात केली. पण, १४ वर्षांखालील मुले गटातील एका सामन्यात आरव देसाईच्या अचूक माऱ्यासमोर सेंट जोसेफ हायस्कूल ( पनवेल) संघानं शरणागती पत्करली. त्यानं आठ विकेट्स घेत बॉम्बे स्कॉटीश स्कूल ( माहिम) संघाला २९३ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
१४ वर्षांखालील मुले गटाच्या सामन्यात माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूल संघानं ३३ षटकांत ३ बाद ३३९ धावांचा डोंगर उभा केला. अर्णव म्हांब्रेच्या ६७ आणि अनिरुद्ध शेळकेच्या ३५ धावांच्या जोरावर बॉम्बे संघानं त्रिशतकी मजल मारली. प्रत्युत्तरात पनवेलच्या सेंट जोसेफ हायस्कूलचा संपूर्ण संघ ११.२ षटकांत ४६ धावांत तंबूत परतला. आरव देसाईने ८ विकेट्स घेत सेंट जोसेफ संघाच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले.
याच गटातील दुसऱ्या सामन्याचा निकाल ३ चेंडूंत लागला. कुर्ल्यातील अल बरकत मलिक मुहम्मद इस्लाम इंग्लिश स्कूल संघानं अफ्फान काझीच्या ( ५ विकेट्स) भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुलुंडच्या नेक्स्ट स्कूल संघाचा पूर्ण डाव ७.४ षटकांत ६ धावांवर गुंडाळला. अल बरकत मलिक मुहम्मद इस्लाम इंग्लिश स्कूल ( कुर्ला) संघाने हे लक्ष्य तीन चेंडूत पार केले. आयईएस दिगंबर पाटकर विद्यालय ( दादर) संघानं २२२ धावांनी रायन इंटरनॅशनल स्कूल ( नेरूळ) संघाला पराभवाची चव चाखवली. आदित्य मांजरेने ८८ चेंडूंत ११२ धावांची फटकेबाजी केली. त्याला सुयष शिंदेची योग्य साथ लाभली आणि त्या जोरावर दिगंबर पाटकर विद्यालय संघाने ३ बाद २९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात रायन इंटरनॅशनल स्कूल संघ १४.२ षटकांत ७० धावांवर तंबूत परतला.
१६ वर्षांखालील मुले गटात व्हीके कृष्णा मेनन अकादमीने ४० षटकांत ५ बाद ३३३ धावांचा डोंगर उभा केला. शाश्वत कपूरच्या १०६ आणि सुमित सिंगच्या ४९ धावांच्या जोरावर मेनन अकादमीने ही मजल मारली. पण, प्रतिस्पर्धी सरस्वती विद्यालय ( ठाणे) संघाचा डाव ३१.१ षटकांत ८४ धावांवर गडगडला. सत्यम यादवने ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सामन्यात सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल ( वांद्रे) संघाने ३७.२ षटकांत २ बाद २१६ धावा करून आठ विकेट्स राखून विजय मिळवला. अर्जुन जैस्वालने ११८, तर अम्मान परवेझने नाबाद ५२ धावांची खेळी केली. प्रतिस्पर्धी अभिनव विद्यामंदिर ( बोरिवली) संघाने ४० षटकांत ९ बाद २१५ धावा केल्या होत्या. १२१ चेंडूंत ११८ धावा करणाऱ्या अर्जुन जैस्वालला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
१६ वर्षांखालील मुले
डॉन बॉस्को हायस्कूल ( माटुंगा) ५.२ षटकांत १ बाद ५५ ( नमन झावर २०, अनिकेत सिंग १४*) वि. वि. सेव्हन स्क्वेअर अकादमी ( मिरारोड) १८.३ षटकांत सर्वबाद ५१; सामनावीर – अद्वैत राणे ( ५ विकेट्स)
व्हीके कृष्णा मेनन अकादमी ४० षटकांत ५ बाद ३३३ ( शाश्वत कपूर १०६, सुमित सिंग ४९) वि. वि. सरस्वती विद्यालय ( ठाणे) ३१.१ षटकांत सर्वबाद ८४; सामनावीर – सत्यम यादव ( ५ विकेट्स)
आरव्ही नेरकर सेकंडरी स्कूल ( वसई) २७.३ षटकांत २ बाद १५२ ( रितिष पाटील ७१, चैतन्या शेडगे ५९) वि. वि. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल ( ठाणे) ३२ षटकांत ८ बाद १५१; सामनावीर – रितिष पाटील ( ७८ चेंडूंत ७१ धावा)
वसंत विहार हायस्कूल ७.४ षटकांत १ बाद ४६ ( सोहम कीर १६*, कृष्णा सिंग १३*) वि. वि. एसव्हीकेएम जेव्ही पारेख ( विलेपार्ले) १४.३ षटकांत सर्वबाद ४५; सामनावीर – प्यारेलाल चौहान ( ५ विकेट्स)
रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूल ( खार) ११.५ षटकांत १ बाद ६५ ( सिद्धांत राय ३७*, रोशन कनोजिया २१*) वि. वि. ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल ( कांदिवली) २४.३ षटकांत सर्वबाद ६३; सामनावीर – शॉन डीकोस्टा ( ४ विकेट्स)
सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल ( वांद्रे) ३७.२ षटकांत २ बाद २१६ ( अर्जुन जैस्वाल ११८, अम्मान परवेझ ५२*) वि. वि. अभिनव विद्यामंदिर ( बोरिवली) ४० षटकांत ९ बाद २१५; सामनावीर – अर्जुन जैस्वाल ( १२१ चेंडूंत ११८ धावा)
आयईएस न्यू इंग्लिश स्कूल ( वांद्रे) २०.३ षटकांत २ बाद १३१ ( मनन भट्ट ४८*, यश राजन ४२*) वि. वि. व्हीपीएम विद्यामंदिर ( दहिसर) ३९.२ षटकांत सर्वबाद १३०; सामनावीर – मनन भट्ट ( ४४ चेंडूंत नाबाद ४८ धावा)
छत्रभुज नर्सी स्कूल ( विलेपार्ले) १४.२ षटकांत २ बाद ९८ ( हृदय मेहता ६७*, विहान मेहता २२*) वि. वि. डीजी इंटरनॅशनल स्कूल ( ठाणे) ३४.२ षटकांत ८ बाद ९७; सामनावीर – हृदय मेहता ( ३८ चेंडूंत नाबाद ६७ धावा)
१४ वर्षांखालील मुले
बॉम्बे स्कॉटीश स्कूल ( माहिम) ३३ षटकांत ३ बाद ३३९ ( अर्णव म्हांब्रे ६७, अनिरुद्ध शेळके ३५) वि. वि. सेंट जोसेफ हायस्कूल ( पनवेल) ११.२ षटकांत सर्वबाद ४६; सामनावीर – आरव देसाई ( ८ विकेट्स)
शारदाश्रम विद्यामंदिर ( दादर) ४.२ षटकांत १ बाद ३८ ( मृदूल भुषण १४*, इशान पाटकर ६) वि. वि. आयईएस स्कूल ( भांडूप) २१.२ षटकांत सर्वबाद ३५; सामनावीर – अविरल दुबे ( ५ विकेट्स)
विब्ग्योर हायस्कूल ( मालाड पूर्व) २७ षटकांत १ बाद २०३ ( आदित्य विश्वकर्मा १००*, आराध्य सोमानी ६५*) वि. वि. विब्ग्योर रूट्स अँड राईज ( मालाड) ३६ षटकांत ९ बाद २०२; सामनावीर – आदित्य विश्वकर्मा ( ७१ चेंडूंत नाबाद १०० धावा)