नागपूर: मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत नागपूर टप्प्यात बुधवारी फलंदाजाच्या आतषबाजीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ओम लुथाडे आणि श्री चौधरी यांच्या शतकांच्या जोरावर श्री राजेंद्र हायस्कूल संघाने ४०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सचिन पाल आणि तेजस कुंभारे यांची आपापल्या संघांसाठी शतकी खेळी करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला.
१४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात ओम लुथाडेने ९९ चेंडूंत १६५ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला श्री चौधरीनेही १११ धावांची खेळी करून साजेशी साथ दिली आणि या दोन शतकी खेळींच्या जोरावर श्री राजेंद्र हायस्कूल संघाने ४० षटकांत ३ बाद ४५८ धावांचा डोंगर उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना पोदार वर्ल्ड स्कूलचा संघ १५.१ षटकांत ५६ धावांत तंबूत पाठवून श्री राजेंद्र हायस्कूल संघाने ४०२ धावांनी मोठा विजय मिळवला.
संदीपान स्कूल संघानेही न्यू ॲपोस्टॉलिक इंग्लिश हायस्कूल संघावर २९१ धावांनी विजय मिळवला. सचिन पालची १०३ धावांची शतकी खेळी आणि देव निगम याच्या ६८ धावांच्या जोरावर संदीपानी स्कूल ( हजारीपहाड ) संघाने ४० षटकांत ४ बाद ३४१ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या न्यू ॲपोस्टॉलिक इंग्लिश हायस्कूल संघाला २१.१ षटकांत (९) ५० धावांवर गुंडाळले. सचिन पालला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तिसऱ्या सामन्यात भवन्स बीपी विद्यामंदिर संघाच्या तेजस कुंभारेची आतषबाजी पाहायला मिळाली. त्याच्या नाबाद ११५ आणि प्रथम चावलाच्या ७९ धावांमुळे भवन्स बीपी विद्यामंदिर संघाने २ बाद २४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात सरस्वती विद्यालय हायस्कूल संघाचा डाव ३४ षटकांत ६१ धावांवर आटोपला. भवन्स बीपी हायस्कूल संघाने १८० धावांनी हा सामना जिंकला.
संक्षिप्त धावफलक
१४ वर्षांखालील मुले
श्री राजेंद्र हायस्कूल ४० षटकांत ३ बाद ४५८ ( ओम लुथाडे १६५, श्री चौधरी १११) वि. वि. पोदार वर्ल्ड स्कूल १५.१ षटकांत सर्वबाद ५६; सामनावीर – ओम लुथाडे ( ९९ चेंडूंत १६५ धावा)
संदीपानी स्कूल ( हजारीपहाड ) ४० षटकांत ४ बाद ३४१ ( सचिन पाल १०३ , देव निगम ६८) वि. वि. न्यू ॲपोस्टॉलिक इंग्लिश हायस्कूल २१.१ षटकांत सर्वबाद (९) ५० धावा; सामनावीर – सचिन पाल ( १०४ चेंडूंत १०३ धावा)
भवन्स बीपी विद्यामंदिर ( आष्टी) ४.२ षटकांत बिनबाद ३२( अथर्व काळे १७*, अनिष ठेंगरे ९*) वि. वि. एसएस इंटरनॅशनल स्कूल ८.४ षटकांत सर्वबाद ३०; सामनावीर – चेतन मीना ( १.४-०-७-५)
सेंटर पॉईंट स्कूल ( वर्धमान नगर ) ११.४ षटकांत १ बाद १०० ( सुल्तान चिमथंवाला ५३*, वेदांत व्यावहारे २६*) वि. वि. एमकेएच संचेती पब्लिक स्कूल २२.५ षटकांत सर्वबाद ९८; सामनावीर – सुल्तान चिमथंवाला ( नाबाद ५३ धावा)
नारायण विद्यालयम ( वर्धा रोड) २६ षटकांत ६ बाद १२१ ( केव्हिन करमचंदानी २८, आयुष कुमार १८) वि. वि. भवन्स बीपी विद्यामंदिर ( श्रीकृष्ण नगर) २८.१ षटकांत सर्वबाद ११९; सामनावीर – अन्वय लाडे ( ७ धावा आणि ४-०-१९-२)
सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड) १५.४ षटकांत ३ बाद १४३ ( देवांश ठक्कर ८२*, राजवीर जॉली ३१) वि. वि. स्कूल ऑफ स्कॉलर्स ३४.२ षटकांत सर्वबाद १३९; सामनावीर – देवांश ठक्कर ( ४८ चेंडूंत नाबाद ८२ धावा आणि ८-१-२१-२)
सेंटर पॉईंट स्कूल ( दाभा) ६ बाद २६७ ( राजवंश अग्रवाल ९९, इकनूर सिंग ४२) वि. वि. के जॉन पब्लिक स्कूल २१.१ षटकांत सर्वबाद ७३; सामनावीर – राजवंश अग्रवाल ( ११२ चेंडूंत ९९ धावा)
भवन्स बीपी विद्यामंदिर ( सिव्हिल लाईन्स) २ बाद २४१ ( तेजस कुंभारे ११५*, प्रथम चावला ७९) वि. वि. सरस्वती विद्यालय हायस्कूल ३४ षटकांत सर्वबाद ६१; सामनावीर – तेजस कुंभारे ( १२० चेंडूंत नाबाद ११५ धावा)