मुंबई: मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा मुंबई टप्प्याचा आजचा दिवस गोलंदाजांनी गाजवला. रायन इंटरनॅशनलच्या हर्ष रावने ९, रायन इंटरनॅशनल ( चेंबूर) विवान संघानीने ८ विकेट्स घेत आज वर्चस्व गाजवले. लोकपुरम पब्लिक स्कूलच्या साई परुळेकरनेही अष्टपैलू कामगिरी करताना ठसा उमटवला. मुलींच्या गटात आयईएस नवी मुंबई हायस्कूल जुईली भेकरेची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली.
१४ वर्षांखालील मुले गटात लोकपुरम पब्लिक स्कूल ( ठाणे) संघाने छत्रभुज नर्सी स्कूल ( कांदिवली ) संघावर विजय मिळवला. लोकपुरम संघाने आर्या पादळे (७२*) आणि यश सॅलियन (५३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सर्वबाद २५१ धावा केल्या. प्रत्युतरार छत्रभुज नर्सी स्कूल ( कांदिवली ) संघ १२९ धावांत गडगडला. साई परुळेकरने ५० धावा आणि ६ विकेट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात हर्ष रावने ९ विकेट्स घेत रायन इंटरनॅशनल ( कांदिवली) संघाला ४९ धावांनी विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना रायन इंटरनॅशनल कांदिवली संघाला २१.३ षटकांत सर्वबाद १०० धावा करता आल्या. पण, हर्षने ९ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी रायन इंटरनॅशनल ( मालाड ) संघाचा डाव १२.३ षटकांत ५१ धावांत गुंडाळला.
विवान संघानीने ८ विकेट्स घेत रायन इंटरनॅशनल ( चेंबूर ) संघाला सेंट ॲलॉयसिस हायस्कूल ( वांद्रे) संघावर १३८ धावांनी विजय मिळवून दिला. रायन इंटरनॅशनल संघाने अर्णव कुलकर्णी ( ७६) आणि रिषी अय्यर (५८) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सेंट ॲलॉयसिस हायस्कूल ( वांद्रे) संघ ८० धावांत माघारी परतला.
अन्य सामन्यांत छत्रभुज नर्सी मोनजी स्कूल ( विलेपार्ले) संघाच्या श्रेयान पटेलने ७ विकेट्स घेतल्या. १६ वर्षांखालील मुले गटात अंजुमन ए इस्लाम इंग्लिश स्कूल ( वाशी) संघाच्या साहिल शेखने ७ विकेट्स घेतल्या, तर मुलींच्या गटात आयईएस नवी मुंबई हायस्कूल जुईली भेकरेची ( ५० धावा आणि ३ विकेट्स ) अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली.
संक्षिप्त धावफलक
१६ वर्षांखालील मुले
व्हीपीएम विद्यामंदिर ( दहिसर) ७.३ षटकांत २ बाद ७३ ( कौशिक शुक्ला १८, शिवम घोष १७*) वि. वि. बालमोहन विद्यामंदिर ( दादर) २२.४ षटकांत सर्वबाद ७०; सामनावीर – मयांक राणा ( ५ विकेट्स)
ट्री हाऊस हायस्कूल ( विरार) २९.४ षटकांत सर्वबाद १३६ ( शुभम पलई २९, क्रिश सिंग २२) वि. वि. डीजी इंटरनॅशनल स्कूल ( ठाणे) २२.२ षटकांत ९ बाद ५४; सामनावीर – तनिष्क माने, डीजी इंटरनॅशनल स्कूल ( ६ विकेट्स)
अंजुमन ए इस्लाम इंग्लिश स्कूल ( वाशी) १७.२ षटकांत सर्वबाद ८४ ( आरिफ खान १५, उमर मुजावर १३) वि. वि. अभिनव विद्यामंदिर ( बोरीवली) १४.५ षटकांत सर्वबाद ४९; सामनावीर – साहिल शेख ( ७ विकेट्स)
वसंत विहार हायस्कूल ( ठाणे) ८.३ षटकांत २ बाद ७० ( क्रिष्णा सिंग २७*, प्रणव सत्वी १८) वि. वि. होली क्रॉस हायस्कूल ( लोअर परेल ) २२.४ षटकांत सर्वबाद ६७; सामनावीर – आयुष परब ( ४ विकेट्स)
व्हीके क्रिष्णा मेनन अकादमी ( बोरीवली) ८ बाद २७३ ( फरदीन शेख ५८, सत्यम यादव ५७) वि. वि. सेंट ॲन्ने कॉन्व्हेंट स्कूल ( वसई) सर्वबाद १५५; सामनावीर – सत्यम यादव ( ५७ धावा आणि ३ विकेट्स)
रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल ( खार) सर्वबाद २१० ( सिद्धांत राय ६६, अभिषेक यादव ३०) वि. वि. शारदाश्रम विद्यामंदिर ( दादर) सर्वबाद ८३; सामनावीर – निषित बल्ला ( ५ विकेट्स)
श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ( ठाणे) ४ बाद २३५ ( रित्विक मोहंती ६५, तक्ष उप्रेती ५७*) वि. वि. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल ६ बाद २०६; रित्विक मोहंती ( ६५ धावा आणि २ विकेट्स)
डॉन बॉस्को ( माटुंगा) १ बाद ६५ ( आदी घाडीगावकर २४*, अनिकेत सिंग २१*) वि. वि. सेंट ॲलॉयसिस हायस्कूल सर्वबाद ६१; सामनावीर – आर्या गांधी ( ४ विकेट्स)
१४ वर्षांखालील मुले
लोकपुरम पब्लिक स्कूल ( ठाणे) सर्वबाद २५१ ( आर्या पादळे ७२*, यश सॅलियन ५३) वि. वि. छत्रभुज नर्सी स्कूल ( कांदिवली ) सर्वबाद १२९; सामनावीर – साई परुळेकर ( ५० धावा आणि ६ विकेट्स)
रायन इंटरनॅशनल ( कांदिवली) २१.३ षटकांत सर्वबाद १०० ( आकाश यादव १८, नील जोगानी १८) वि. वि. रायन इंटरनॅशनल ( मालाड ) १२.३ षटकांत सर्वबाद ५१; सामनावीर – हर्ष राव (९ विकेट्स)
छत्रभुज नर्सी मोनजी स्कूल ( विलेपार्ले) ५ बाद ३२५ ( विहान मेहता ११२, देवांश शाह ७३) वि. वि. एनएल दालमिया हायस्कूल ( मिरारोड ) सर्वबाद ४२; सामनावीर – श्रेयान पटेल ( ७ विकेट्स)
आयईएस न्यू इंग्लिश स्कूल ( वांद्रे ) ५ बाद ३०५ ( अनंत देसाई ११०*, हृषीकेश गोरे ६५) वि. वि. सिस्टर निवेदिता इंग्लिश मीडियम स्कूल ( डोंबिवली ) सर्वबाद ८५; सामनावीर – अनंत देसाई ( ११०*)
हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल ५ बाद २२७( जश वासू ३७, प्रणव विश्वकर्मा ३२) वि. वि. आयईएस राजा शिवाजी विद्यालय सर्वबाद ११३ ; सामनावीर – सईश पालव ( ५ विकेट्स)
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) ३.३ षटकांत बिनबाद २२( आफ्ताब मनिहार १२*, रय्याम मोरिस्वाला ९*) वि. वि. दादर पारसी युथ असेंब्ली सर्वबाद २१; सामनावीर – आलोक पाल ( ७ विकेट्स)
रायन इंटरनॅशनल ( चेंबूर ) सर्वबाद २१८ ( अर्णव कुलकर्णी ७६, रिषी अय्यर ५८) वि. वि. सेंट ॲलॉयसिस हायस्कूल ( वांद्रे) सर्वबाद ८०; सामनावीर – विवान संघानी ( ८ विकेट्स)
शिशुवन स्कूल ( माटुंगा) ६ बाद १७० ( रिषभ कराणी ८२*, तिर्थ गडा १९*) वि. वि. दी एनकेईएस हायस्कूल ८ बाद १६९; सामनावीर – रिषभ कराणी ( नाबाद ८२ )
१६ वर्षांखालील मुली
आयईएस नवी मुंबई हायस्कूल ४ बाद २५२ ( अनुजा सावंत ५३*, जुईली भेकरे ५०) वि. वि. एसएम शेट्टी हायस्कूल ( पवई) सर्वबाद ७५; सर्वोत्तम खेळाडू- जुईली भेकरे ( ५० धावा आणि ३ विकेट्स )