पुणे, १५ डिसेंबर २०२३ : मुंबई खिलाडी संघाने अल्टीमेट खो खोच्या सीझन २ साठीची तयारी ओडिशातील भुवनेश्वर येथील बिजू पटनायक इनडोअर स्टेडियममधील KIIT कॅम्पस येथे सुरू केली आहे. प्रशिक्षक विकास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली २६ सदस्यीय संघाने प्रशिक्षण शिबिराला सुरुवात केली असून २४ डिसेंबरपासून सुरू होणार्या हंगामापूर्वी त्यांची कौशल्ये आणि रणनीती त्यांनी तयार केली आहेत.
पुण्यातील philanthropist आणि उद्योगपती पुनित बालन यांच्या मालकीच्या संघाने ड्राफ्टमध्ये उदयोन्मुख तरुणांना संधी दिली आणि काही प्रमुख खेळाडूंना संघात कायम राखले आहे. त्यामुळे त्यांना यंदाच्या पर्वात यशस्वी कामगिरीची अपेक्षा आहे. “अल्टीमेट खो खोच्या सीझन २ साठीची अपेक्षा आणि ऊर्जा उत्साहवर्धक आहे. आमचे खेळाडू कठोरपणे सराव करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ते त्यांचा अव्वल दर्जाचा खेळ लीगमध्ये खेळतील. आमच्या चाहत्यांचा पाठिंबा अमूल्य आहे आणि एका रोमांचक हंगामासाठी आम्ही सज्ज आहोत,” मुंबई खिलाडीचे मालक पुनित बालन यांनी सांगितले.
खेळाडूंच्या सर्वांगीण वाढीसाठी मुंबई खिलाडी संघाने विविध उपाययोजना केल्या आहेत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकासह, फिजिओजच्या टीमसह संघ प्रवास करत आहेत. जे खेळाडूंच्या तंदुरूस्तीवर लक्ष ठेऊन आहेत. त्याशिवाय खेळाडू पोहणे आणि बॅडमिंटन सारख्या इतर क्रीडा प्रकारातूनही फिटनेस राखत आहेत. खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक मानसशास्त्रज्ञ देखील संघासोबत असतो.
१० डिसेंबरपासून सुरू झालेले हे शिबिर २० डिसेंबरपर्यंत असेल आणि त्यानंतर मुंबई खिलाडी संघाचा पहिला सामना २४ डिसेंबरला तेलुगु योद्धा संघाविरुद्ध होईल.
“आम्ही संपूर्ण भारतातून काही सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे, पण खो खो हा सांघिक खेळ आहे आणि त्यासाठी सांघिक भावना निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आम्ही वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंमधील अंतर कमी करण्यासाठी काम करत आहोत, जेणेकरून ते मॅटवर पाऊल ठेवतील तेव्हा त्यांना अवघडल्यासारखं वाटणार नाही. या सराव शिबिरामुळे, आम्ही सांघिक संयोजनावर काम करण्याचा आणि आमच्या खेळाडूंचा एकंदर फिटनेस स्तर उंचावण्याचा विचार करत आहोत, जे स्पर्धेच्या पुढे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक असेल, ” असे प्रशिक्षक विकास सूर्यवंशी यांनी सांगितले.
भारतातील पहिल्या-वहिल्या फ्रँचायझी-आधारित खो-खो लीगच्या सीझन २ मधील थरारक सामने Sony Pictures Networks India (SPNI) च्या क्रीडा चॅनेलवर तसेच Sony LIV वर थेट प्रसारित केली जाईल. (Mumbai Khiladi side practice for Alti Kho Kho season 2)
महत्वाच्या बातम्या-
आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत स्टार इलेव्हन, किंग्ज स्पोर्टस संघाची विजयी सलामी
INDvsSA ODI Series: टीम इंडियाने कसली कंबर, कधी, कुठे आणि कसे पाहता येतील सामने? वेळा घ्या जाणून