येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Ipl 2022) स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत अनेक मोठमोठे बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत ८ संघ या स्पर्धेत खेळताना दिसून येत होते. आगामी हंगामापासून १० संघ या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. तसेच येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान ही स्पर्धा कुठे रंगणार आहे, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
जगभरात गेल्या २ वर्षांपासून कोरोनाने धूमाकूळ घातला आहे. ज्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही झाल्याचा पाहायला मिळाला आहे . याच कारणामुळे आयपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते. तसेच २०२१ मध्ये ही स्पर्धा भारतात खेळवण्यात आली होती. परंतु स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊन लागली होती. ज्यामुळे या स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवण्यात आला.
या ठिकाणी रंगणार आयपीएल २०२२ स्पर्धेचे सामने
सूत्राने दिलेल्या माहीतीनुसार, बीसीसीआयने (Bcci) आयपीएल २०२२ स्पर्धेचे सर्व सामने मुंबईत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मुंबईमध्ये ३ स्टेडियम आहेत. याबाबत बोलताना सूत्राने म्हटले की, “आम्ही आतापर्यंत मुंबई सोडून कुठलाही विचार केला नाहीये. सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. त्यामुळे परदेशात स्पर्धेचे आयोजन करण्याची आवश्यकता नाहीये.”
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, आयपीएल २०२२ स्पर्धा २७ मार्च पासून सुरू होणार आहे. तसेच आता बीसीसीआय संपूर्ण आयपीएल स्पर्धेचे आयोजन मुंबईत करण्याच्या विचारात आहे. ज्याची घोषणा येत्या २० फेब्रुवारी रोजी करण्यात येऊ शकते.
मुंबईत कुठे रंगणार आयपीएल २०२२ स्पर्धेचे सामने?
मुंबईत ३ आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त स्टेडियम आहेत. ज्याचा वापर आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी करण्यात येऊ शकतो. यामध्ये वानखेडे स्टेडियम, ब्रेब्रॉन स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियमचा समावेश आहे. आवश्यकता भासल्यास हे सामने पुणे येथे देखील खेळवले जाऊ शकतात. हे सामने एकाच ठिकाणी खेळवण्याचे मुख्य कारण म्हणजे, या सामन्यांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हवाई मार्गाने जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच पंचतारांकित हॉटेल स्टेडियमच्या जवळ असल्यामुळे बायो बबलमध्ये जास्त अडचणी येणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या :
पंतप्रधान मोदींच्या पत्राने भारावला इंग्लिश क्रिकेटपटू; ‘खास कार्यासाठी भेटण्याची व्यक्त केली इच्छा
दीपक हुड्डाचा ‘हा’ किस्सा वाचून प्रत्येक क्रिकेटचाहत्याला वाटेल अभिमान
हे नक्की पाहा: