खराब फॉर्ममुळे मुरली विजय आयपीएलच्या मागील २ हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. गेल्या ५ हंगामात त्याला फक्त ६ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज या चॅम्पियन संघाचा भाग असला तरी. या ३८ वर्षीय सलामीवीर फलंदाजाने तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) च्या सामन्यात शतक झळकावले. यादरम्यान त्याने १२ षटकार आणि ७ चौकार मारले. म्हणजेच अवघ्या १९ चेंडूत १०० धावा केल्या. मात्र, या सामन्यात त्यांच्या संघाचा पराभव झाला.
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या १९व्या सामन्यात नेल्लई रॉयल किंग्जला नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी २९ धावांत २ गडी गमावले. यानंतर बाबा अपराजित आणि संजय यादव यांनी आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या २३० धावांच्या पुढे नेली. संघाने निर्धारित २० षटकात २ बाद २३६ धावा केल्या. ४८ चेंडूत ९२ धावा करून नाबाद राहिला. ५ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याचवेळी, संजयने ५५ चेंडूत १०३ धावा करत शेवटपर्यंत तग धरला.
संघाच्या अर्ध्याहून अधिक धावा केल्या
प्रत्युत्तरादाखल राबी वॉरियर्स संघ एकीकडून विकेट्स गमावत राहिला, पण मुरली विजय खंबीर राहिला. त्याने ५७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शेवटी ६६ चेंडूत १२१ धावा करून तो बाद झाला. संघाला निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १७० धावा करता आल्या. मुरली विजयशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा पल्ला गाठता आला नाही. त्याने संघाच्या अर्ध्याहून अधिक धावा केल्या.
दरम्यान, मुरली विजयचा आयपीएलमधील रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. त्याने २ शतके आणि १३ अर्धशतकांच्या मदतीने २५०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने १०६ सामन्यात २६ च्या सरासरीने २६१९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याची १२७ धावांची सर्वोत्तम खेळी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता ठरलंय! ‘हे’ १२ संघ खेळणार आयसीसी टी२० विश्वचषक, वाचा कधी आणि कुणाशी भिडणार भारत
भारताकडून संधी मिळत नसल्याने इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणार सैनी, द्रविडच्या जुन्या संघात सहभागी