क्रिकेटविश्वाला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभला आहे. यापैकीच एक नाव म्हणजे, मुथय्या मुरलीधरन. मुरलीधरन कसोटी क्रिकेटमध्ये ८०० गडी बाद करणारा एकमेव गोलंदाज आहे. तसेच तो सर्वात आधी ४००,५००, ६००, ७०० आणि ८०० गडी बाद करणारा पहिला गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर त्याने २०१० मध्ये त्याने कसोटी क्रिकेटला राम राम केला होता.
मात्र मुरलीधनने प्रतिनिधित्व केलेल्या श्रीलंका संघाला मागील काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. श्रीलंका संघाला सध्या मुरलीधरनसारख्या गोलंदाजाची आवश्यकता आहे, जो विरोधी संघाच्या फलंदाजांना नांगी टाकायला भाग पडेल. ही कमतरता स्वतः मुरलीधरन भरून काढू शकत नाही, पण त्याची छबी असणारा एक शिलेदार नक्कीच भरून काढू शकतो.
आपल्या आगळ्या वेगळ्या ॲक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुरलीधरनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने सचिन तेंडुलकर, एडम गिलख्रिस्ट, सईद अनवर यांसारख्या दिग्गज फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. आता या दिग्गज खेळाडूचा मुलगा आपल्या वडिलांच्या गोलंदाजीप्रमाणे हुबेहुब गोलंदाजी करताना दिसून आला आहे. म्हणून लवकरच श्रीलंका संघाला आणखी एक मुथय्या मुरलीधरन मिळू शकतो.(Muttaih Muralitharan son naren Muralitharan has similar bowling action as his father watch video)
मुरलीधरनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामधे त्याचा मुलगा नरेन गोलंदाजी करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये नरेन आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या गोलंदाजीचा कोलाज करण्यात आला आहे. यामध्ये नरेनच्या गोलंदाजी त्याचे वडील मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजीची छबी दिसत आहे. या व्हिडिओवर कॅप्शन देत मुरलीधरनने, “वडील आणि मुलाचा वेळ” असे लिहिले आहे.
Father and Son Time! Video credits @SunRisers pic.twitter.com/Jv8fYOAZcp
— Muthiah Muralidaran (@Murali_800) July 15, 2021
मात्र नरेनच्या गोलंदाजीला किती धार आहे?, तो आपल्या वडिलांसारखं फलंदाजांना अडचणीत टाकेल का? हे तर जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरेल तेव्हाच कळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी केकेआरसाठी समस्या होतो, पण त्यावेळी मॉर्गनला कर्णधार बनायचे नव्हते,’ कार्तिकचा उलगडा
खुन्नस! गांगुली ९९ धावांवर बाद झाल्याचे ऐकताच बाथरुममधून पळत आला ‘हा’ दिग्गज, सुनावली खरीखोटी
टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; आयसीसीकडून संघांची गटवारी जाहीर