झिम्बाब्वे आणि बांगलादेश क्रिकेट संघ हरारे येथे एकमेव कसोटी सामना खेळत आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या बांगलादेशने सामन्यावर पकड मिळवल्याचे दिसत आहे. बांगलादेशने पहिल्या डावात उभारलेली आव्हानात्मक धावसंख्या पार करताना झिम्बाब्वेने देखील उत्कृष्ट सुरुवात केली. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज आणि बांगलादेशचा फलंदाज एकमेकांसमोर भिडताना दिसून आले.
दोन वेगवान गोलंदाज आले आमने-सामने
उभय संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी रंजक खेळ पाहायला मिळाला. महमद्दुलाहच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली. मात्र, यादरम्यान झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी व बांगलादेशचा तस्किन अहमद मैदानावर आपापसात भिडताना दिसून आले.
मुझरबानी याचा एक चेंडू अहमद हा समजू शकला नाही. त्यानंतर, अहमद याने हा चेंडू कसा होता हे हातवारे करून सांगितले. मात्र, मुझरबानी याला हे कृत्य आवडले नाही व तो अहमदच्या एकदम जवळ गेला. ते दोघेही इतके नजीक आले होते की, अहमदचा चेहरा उंचपुऱ्या मुझरबानीच्या खांद्यापर्यंत लागत होता. या दोघांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/shihabahsankhan/status/1413043482877329409
सामन्यावर बांगलादेशची पकड
या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. खराब सुरुवातीनंतर, कर्णधार मोमिनुल हक (७०) व लिटन दास (९५) यांनी मधल्या फळीत येऊन संघाच्या धावसंख्येला आधार दिला. महमद्दुलाह व तस्किन अहमद यांनी नवव्या गड्यासाठी १९१ धावांची विक्रमी भागीदारी केली. महमद्दुलाहने १५० तर, अहमदने ७५ धावांचे योगदान दिले. बांगलादेशचा पहिला डाव ४६८ धावांवर संपुष्टात आला.
दुसऱ्या दिवसाखेर झिम्बाब्वेने १ बाद ११४ अशी मजल मारली होती. ब्रेंडन टेलर ३७ आणि कायटानो ३३ धावांवर नाबाद आहेत. झिम्बावेचा एकमेव बळी शाकिब अल हसनने मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘दादा’च्या घरी पोहोचल्या बंगालच्या मुख्यमंत्री